एक्स्प्लोर
Advertisement
IND vs AUS 1st ODI : रोहित शर्माच्या झुंजार शतकानंतरही टीम इंडियाचा पराभव
रोहित शर्माच्या झुंजार शतकानंतरही सिडनीच्या पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियावर 34 धावांनी मात केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकांत नऊ बाद 254 धावांचीच मजल मारता आली.
सिडनी : टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या झुंजार शतकानंतरही सिडनीच्या पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियावर 34 धावांनी मात केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकांत नऊ बाद 254 धावांचीच मजल मारता आली.
कांगारुंच्या प्रभावी आक्रमणासमोर टीम इंडियाची तीन बाद चार अशी केविलवाणी अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत रोहितनं 133 धावांची खेळी करुन टीम इंडियाला विजयाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. त्यानं महेंद्रसिंग धोनीसह चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी साकारली.
धोनीनं तीन चौकार आणि एका षटकारासह 51 धावांची खेळी उभारली. पण या दोघांचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्सकॉम्बची अर्धशतकं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन-डेत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर विजयासाठी 288 धावांचं आव्हान ठेवलं होतं. उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्सकॉम्बच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 5 बाद 288 धावांची मजल मारली होती. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अॅरॉन फिंच आणि अॅलेक्स कॅरी ही सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर ख्वाजा आणि मार्शनं ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. ख्वाजानं सहा चौकारांसह 59 धावांची खेळी उभारली तर मार्शनं चार चौकारांसह 54 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या पीटर हॅन्ड्सकॉम्बनंही 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत कांगारुंना धावांचा 288 टप्पा गाठून दिला. भारताकडून कुलदीप यादवनं दोन तर रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडमधील आगामी विश्वचषक अवघ्या साडेचार महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्या विश्वचषकाची तयारी करायची तर टीम इंडियाच्या हाताशी आता 13 वन डे आणि पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामने आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील आगामी विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला ही मालिका महत्वाची ठरणार आहे.Rohit's century in vain as Australia win the 1st ODI by 34 runs. Series 1-0 now #AUSvIND pic.twitter.com/RlcDGlEGSD
— BCCI (@BCCI) January 12, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement