एक्स्प्लोर
Advertisement
चॅम्पियन्स ट्रॉफी : हरभजनची आठ जणांच्या सदिच्छादूतांमध्ये निवड
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने, आठ क्रिकेटपटूंची चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या आठ सदिच्छादूतांची निवड केली आहे. या आठ सदिच्छादूतांमध्ये भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहचा समावेश करण्यात आला आहे.
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये 1 ते 18 जून या कालावधीत खेळवली जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठ सदिच्छादूतांमध्ये भारताचा हरभजन सिंह, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा हबिबूल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्यूझीलंडचा शेन बॉण्ड, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्थिम यांचा समावेश आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 50 दिवस आधी सदिच्छादूतांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि बांगलादेशमध्ये ओव्हलच्या मैदानात होणार आहे.
आठ सदिच्छादूतांनी एकूण 1774 वन डे सामने खेळले आहेत. याशिवाय 48 शतकांसह 51,906 धावा केल्या असून 838 विकेट्स घेतल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
महाराष्ट्र
Advertisement