एक्स्प्लोर
धोनी आज मैदानात उतरताच मोठा विक्रम रचणार!
भारतासाठी 500 आतंरराष्ट्रीय सामने खेळणारा धोनी हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडनंतर तिसरा खेळाडू ठरणार आहे. भारताच्या सर्वश्रेष्ठ कर्णधारांमध्ये धोनीचं नाव वरच्या क्रमांकावर घेतलं जातं.
लंडन : भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज महेद्रसिंह धोनीसाठी आज इंग्लंडविरुद्ध होणारा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. धोनी आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आज इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेन.
भारतासाठी 500 आतंरराष्ट्रीय सामने खेळणारा धोनी हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडनंतर तिसरा खेळाडू ठरणार आहे. भारताच्या सर्वश्रेष्ठ कर्णधारांमध्ये धोनीचं नाव वरच्या क्रमांकावर घेतलं जातं.
सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. तर ‘द वॉल’ राहुल द्रविड भारतासाठी 509 सामने खेळला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिननंतर श्रीलंकेच्या महेला जयवर्धने (652 सामने), कुमार संघकारा (594 सामने) यांचा समावेश होतो.
धोनीचं क्रिकेट करिअर
महेंद्रसिंह धोनीने 2004 साली बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने 2005 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तर टी-ट्वेण्टीमध्ये 2006 साली भारतीय संघात पदार्पण केले. धोनीने आत्तापर्यंत 90 कसोटी, 318 वनडे आणि 91 टी-ट्वेण्टी असे एकूण 499 सामने खेळले आहेत.
आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने कसोटीमध्ये सहा शतके आणि 33 अर्धशतकांसह 4,876 धावा केल्या आहेत. तर वनडेतील सर्वश्रेष्ठ फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने वनडेमध्ये 10 शतके आणि 67 अर्धशतके झळकावत 9,967 धावा ठोकल्या आहेत. टी-ट्वेण्टीमध्येही धोनीच्या नावावर दोन अर्धशतकांसह 1,444 धावांची नोंद आहे.
आक्रमक फलंदाजी आणि संयमी वर्तनासाठी ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-ट्वेण्टी विश्वचषक(2007),वनडे विश्वचषक(2011), चॅम्पियन ट्रॉफी(2013) या आयसीसीच्या लोकप्रिय टूर्नामेंट जिंकत विक्रम नोंदवला. तसंच धोनीच्याच नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदाच आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत नंबर वन होण्याचा बहुमान मिळवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement