एक्स्प्लोर

हाय व्होल्टेज मार्च...

2018 चा मार्च महिना क्रिकेटविश्वासाठी खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या महिन्यात काही अनपेक्षित, काही रोमहर्षक आणि काही अक्षरश: क्रिकेटविश्वाला हादरवणाऱ्या घटना घडल्या.

मुंबई : 2018 चा मार्च महिना क्रिकेटविश्वासाठी खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या महिन्यात काही अनपेक्षित, काही रोमहर्षक आणि काही अक्षरश: क्रिकेटविश्वाला हादरवणाऱ्या घटना घडल्या. श्रीलंकेतल्या निदाहास चषक टी20 स्पर्धेतला दिनेश कार्तिकचा शेवटच्या चेंडूवरचा षटकार असो किंवा अफगाणिस्तानचं अनपेक्षितपणे 2019च्या विश्वचषकासाठी पात्र होणं असो, यामुळे क्रिकेटमधील अंतिम क्षणापर्यंतचा रोमांच क्रिकेट रसिकांना अनुभवता आला. ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका संघामधल्या मालिकेतील केपटाऊन कसोटीतलं बॉल टॅम्परिंग प्रकरण चांगलच गाजलं. याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर झालेले मॅचफिक्सिंगचे आरोप, तिरंगी टी-20 मालिकेत बांगलादेशी संघानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दाखवलेली अखिलाडूवृत्ती, इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती, देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजीपाठोपाठ विदर्भानं इराणी करंडकावरही आपलं नाव कोरलं. या सर्व घडामोडींमुळे मार्च महिना खरोखरच क्रिकेटविश्वासाठी हाय व्होल्टेज महिना ठरला. यानिमित्तानं या सर्व घटनाक्रमांचा घेतलेला हा सविस्तर आढावा... हाय व्होल्टेज मार्च... दि. 6 मार्च 2018 शमी, मॅच फिक्सिंग आणि क्लीन चिट भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीकडून मॅचफिक्सिंगसारखा गंभीर आरोप केला गेला. त्यामुळे बीसीसीआयनं सुरुवातीला शमीला कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून वगळलं होतं. त्यानंतर बीसीसीआयनं या आरोपांच्या चौकशीचे आदेश अँटी करप्शन युनिटला दिल्यानंतर आलेल्या चौकशी अहवालात शमीला क्लीन चीट दिली. गेली आणि पुन्हा शमीचा कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या ब श्रेणीत समावेश करण्यात आला. हाय व्होल्टेज मार्च... दि. 16 मार्च 2018 बांगलादेशी खेळाडूंची अखिलाडू वृत्ती कोलंबोतल्या तिरंगी ट्वेन्टी ट्वेन्टीत बांगलादेशच्या खेळाडूंकडून अखिलाडूवृत्तीचं प्रदर्शन घडवलं. श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक साखळी सामन्याच्या शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. यावेळी षटकातला हा दुसरा बाऊंसर असल्यानं नो बॉल असल्याचं सांगत मैदानाबाहेर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं पंचांशी हुज्जत घालत फलंदाजांना ड्रेसिंग रुममध्ये परतण्याच्या सूचना केल्या. पण त्यानंतर सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हस्तक्षेप करत सामना पुन्हा सुरु केला. मात्र सामना संपल्यावरही बांगलादेशी आणि श्रीलंकनं खेळाडूंची बाचाबाची झाली. आयसीसीनं याप्रकरणी कर्णधार शाकिब अल हसनवर मानधनाच्या २५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. हाय व्होल्टेज मार्च... दि. 18 मार्च 2018 दिनेश कार्तिकचा विजयी षटकार भारत, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश असलेल्या निदाहास चषक ट्वेन्टी ट्वेन्टीचा अंतिम सांमना क्रिकेटरसिकांच्या ह्रदयाचे अक्षरश ठोके वाढवणारा ठरला. भारताच्या दिनेश कार्तिकनं या सामन्यात बांगलादेशच्या तोंडून विजयाचा घासच हिरावून घेतला. अंतिम चेंडूवर पाच धावा जिंकण्यासाठी हव्या असताना कार्तिकनं  ठोकलेल्या विजयी षटकारानं भारताला विजेतेपद मिळवून दिलं. या सामन्यात दिनेश कार्तिक मैदानात उतरला तेव्हा टीम इंडियाला जिंकण्यासाठी 12 चेंडूत 34 धावांचं कठीण आव्हान समोर होतं. पण दिनेश कार्तिकच्या 8 चेंडूतल्या नाबाद 29 धावांच्या खेळीनं टीम इंडियानं अविस्मरणीय विजय साजरा केला. हाय व्होल्टेज मार्च... दि. 18 मार्च 2018 केव्हिन पीटरसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय एकेकाळी इंग्लंड संघाचा भक्कम आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या केविन पीटरसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केलं. पीटरसननं ट्विटरवरुन निवृत्तीची घोषणा करून, आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. इंग्लंडच्या या धडाकेबाज फलंदाजानं १०४ कसोटी, १३६ वन डे आणि ३७ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये इंग्लडचं  प्रतिनिधित्व केलं होतं. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मिळून तीस हजारांपेक्षा जास्त धावा आहेत. मात्र 2014 च्या अशेस मालिकेतील दारुण पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानं पीटरसनसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दारं बंद केली होती. हाय व्होल्टेज मार्च... Photo- twitter espncricinfo दि. 18 मार्च 2018 विदर्भाचा विजयाचा डबल धमाका यंदाच्या मोसमात फैझ फजलच्या विदर्भानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलाच दबदबा राखला. वर्षाच्या सुरुवातीलाच विदर्भानं रणजी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. मात्र त्यानंतर इराणी चषकातही विदर्भानं हाच फॉर्म कायम ठेवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. विदर्भाच्या अनुभवी वासिम जाफरची 286 धावांची खेळी या सामन्यात लक्षवेधी ठरली. हाय व्होल्टेज मार्च... 24 मार्च 2018 बॉल टॅम्परिंगचं वादळ या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं. त्यामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टनं खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरनं घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेरानं टिपलं आणि ऑस्ट्रेलियाचं बॉल टॅम्परिंग प्रकरण जगासमोर आलं.या प्रकरणानंतर आयसीसीनं कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर चेंडू अवैधरित्या हाताळल्याप्रकरणी कारवाई केली. आयसीसीनं स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड आणि एका कसोटी सामन्याची बंदी तर बॅनक्रॉफ्टला सामना मानधनाच्या 75 टक्के दंड ठोठावला. हाय व्होल्टेज मार्च... मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्मिथसह उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची तर बॅनक्रॉफ्टला नऊ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार डेव्हिड वॉर्नरच असल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नरवर आयपीएल खेळण्यावरही बंदी घालण्यात आली. हाय व्होल्टेज मार्च... दि. 25 मार्च 2018 अफगाणिस्तानची ऐतिहासिक कामगिरी 2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच पात्र ठरला. पात्रता फेरीत सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात हार पत्करावी लागलेल्या अफगाणिस्ताननं गरुडभरारी घेत विश्वचषकाचं तिकिट कन्फर्म केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget