एक्स्प्लोर
Advertisement
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कपिलदेवच्याही पुढे
पंड्याने आतापर्यंत 26 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये 40.46 च्या सरासरीने त्याच्या नावावर 530 धावा आहेत. तर कपिल देव यांच्या नावावर पहिल्या 26 वन डेत 472 धावा होत्या.
मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियाने नागपूरच्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सने धुव्वा उडवून पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली. भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येत असलेल्या हार्दिक पंड्याने या मालिकेदरम्यान शानदार कामगिरी केली.
अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याची तुलना टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्याशी केली जाते. मात्र कपिलदेव यांच्या तुलनेत हार्दिक पंड्या पुढे आहे. पंड्याने आतापर्यंत 26 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये 40.46 च्या सरासरीने त्याच्या नावावर 530 धावा आहेत. तर कपिलदेव यांच्या नावावर पहिल्या 26 वन डेत 472 धावा होत्या.
पंड्याने 26 वन डेत 530 धावा, 29 विकेट आणि 10 झेल घेतले आहेत. तर कपिलदेव यांनी पहिल्या 26 वन डेत 472 धावा, 28 विकेट आणि 7 झेल घेतले होते. या तुलनेने हार्दिक पंड्या कपिलदेव यांच्याही पुढे आहे.
कपिलदेव यांच्या नेतृत्त्वात भारताला पहिला विश्वचषक मिळाला होता. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून कपिलदेव यांच्याकडे पाहिलं जायचं. त्याचप्रमाणे आता फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सगळ्याच बाबतीत पंड्या कपिलदेव यांच्या पुढे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement