एक्स्प्लोर
Advertisement
संवेदनशील हरभजन, चिमुकलीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत
हरभजनने काही दिवसांपूर्वी खालसा एड नावाच्या ट्विटर हॅण्डलवर चार वर्षांच्या काव्याचा फोटो पाहिला.
नवी दिल्ली : फिरकीपटू हरभजन सिंह सध्या भारतीय क्रिकेटसंघात नसला तरी तो सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असतो. एक ट्वीट पाहिल्यानंतर हरभजनने चार वर्षांच्या मुलीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत केली आहे.
हरभजनने काही दिवसांपूर्वी खालसा एड नावाच्या ट्विटर हॅण्डलवर चार वर्षांच्या काव्याचा फोटो पाहिला. ही मुलगी दिल्लीतील रुग्णालयात दाखल असून तिला मेंदूचा आजार आहे. या आजाराच्या उपचारांसाठी 4600 डॉलरच्या मदतीची गरज आहे, अशी माहिती या ट्वीटमध्ये दिली होती.
काव्याला मदत करण्याची इच्छा
हे ट्वीट पाहिल्यानंतर हरभजनचं काळीज पिळवटलं आणि ट्वीटला रिप्लाय करुन मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. "मी कशाप्रकारे या मुलीची मदत करु शकतो, मला तिच्या उपचारांसाठी मदत करायची आहे. मला सगळी माहिती उपलब्ध करुन द्या," असं ट्वीट हरभजनने केलं.
https://twitter.com/harbhajan_singh/status/922513680004136960
मिळालेल्या माहितीच्या आधारावर भज्जीने दिल्लीतील रुग्णालयात जाऊन काव्याची भेट घेतली. तसंच तिला आर्थिक मदतही केली. यानंतर हरभजनने ट्वीट केलं की, "काव्या आमची मुलगी आहे. देव तिचं रक्षण करो. आम्ही फक्त आमचं काम करत आहोत."
https://twitter.com/harbhajan_singh/status/923269421589708800
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
भज्जी सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असतो. नुकतंच माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी टीम इंडियामध्ये मुस्लीम खेळाडू नसल्याने प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नांना हरभजन सिंहने सडेतोड उत्तर दिलं होतं.
https://twitter.com/harbhajan_singh/status/922332390986358784
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement