एक्स्प्लोर
अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहायचं आहे : मॅग्रा
'सचिनलाही वेगवान गोलंदाज व्हायचं होतं, त्याच्या मुलाला खेळाविषयी आवड आहे हे ऐकून बरं वाटलं'
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्रा यांच्यातील संघर्ष मैदानावर कायमच पाहायला मिळाला आहे. पण तरीही मैदानाबाहेर या दोघांमध्येही संबंध चांगले होते. यामुळेच आता मॅग्रानं सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'सचिनचा मुलगा आता माझ्या मुलाच्या वयाचाच असेल. पण मी आतापर्यंत त्याची गोलंदाजी पाहिली नाही. त्याला गोलंदाजी करताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.' असं मॅग्रा म्हणाला.
'सचिनच्या मुलाला खेळाविषयी आवड आहे हे पाहून मला फार बरं वाटलं. सचिनलाही वेगवान गोलंदाज व्हायचं होतं' असंही मॅग्रा यावेळी म्हणाला.
दरम्यान, नुकताच अर्जुन तेंडुलकर चर्चेत आला होता. कारण की, भारतीय महिला संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्तीला अंतिम सामन्यात अर्जुन नेट्समध्ये गोलंदाजी करत होता.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement