एक्स्प्लोर
राहुलची झुंजार खेळी अपयशी, विंडीजची भारतावर मात
फ्लोरिडा : वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होने अमेरिकेतल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा विजयाचा घास अक्षरश: हिरावला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर अवघ्या एका धावाने निसटता विजय मिळवला.
वेस्ट इंडिजच्या एविन लुईसच्या शतकाला भारताच्या लोकेश राहुलने शतकानेच प्रत्युत्तर दिलं. पण राहुलच्या झुंजार खेळीनंतरही भारताच्या पदरी पराभवच पडला. वेस्ट इंडिजने टीम इंडियाला अवघ्या एका धावेने हरवून अमेरिकेतील मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली.
लॉडरहिलमध्ये झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजने भारताला 246 धावांचं आव्हान दिलं होतं. पण टीम इंडियाला 20 षटकांत चार बाद 244 धावांचीच मजल मारता आली. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी भारताला विजयाची अपेक्षा वाढवली होती. परंतु अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. ड्वेन ब्राव्होने टाकलेला बॉल टोलवण्याच्या नादात धोनीने सोपा झेल दिला आणि भारताच्या आनंदावर विरजण पडलं.
भारताच्या पदरी पराभव आला असला, तरी लॉडरहिलमध्ये लोकेश राहुलनं केलेल्या झुंजार खेळीनं चाहत्यांचं मन जिंकलं. राहुलनं 51 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 110 धावा फटकावल्या. राहुलने अवघ्या 46 चेंडूंमध्येच शतकाची वेस ओलांडली. ट्वेन्टी20 क्रिकेटमधलं दुसरं सर्वात जलद शतक ठरलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये षटकार ठोकून शतक साजरं करण्याचा विक्रमही राहुलच्या नावावर जमा झाला आहे.
याआधी एव्हिन लुईसच्या तुफानी खेळीने लॉडरहिलचं मैदान दणाणून सोडलं. लुईसने 49 चेंडूंत पाच चौकार आणि नऊ षटकारांच्या जोरावर 100 धावांची खेळी उभारली. तर जॉन्सन चार्ल्सनंही 33 चेंडूंत सहा चौकार आणि सात षटकारांसह 79 धावांची खेळी रचली. त्यामुळे वेस्ट इंडिजला 20 षटकांत सहा बाद 245 धावांची मजल मारता आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement