एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : गतविजेत्या जर्मनीचा सलामीच्या सामन्यात पराभव
मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवरच्या या सामन्यात हिरविन्ग लोझानो मेक्सिकोच्या या विजयाचा शिल्पकार ठरला.
रशिया : गतविजेत्या जर्मनीला रशियातल्या फिफा विश्वचषकात सलामीलाच खळबळनजक पराभवाला सामोरं जावं लागलं. फ गटातल्या या सामन्यात मेक्सिकोनं जर्मनीचा १-० असा पराभव केला.
मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवरच्या या सामन्यात हिरविन्ग लोझानो मेक्सिकोच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं ३५व्या मिनिटाला जर्मनीचा गोलरक्षक नोयाला चकवून चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि मेक्सिकोच्या चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आलं.
फिफा विश्वचषकाचा फिव्हर शिगेला पोहोचला आहे. त्यात आजचा जर्मनीचा पराभव जगभरातील फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement