एक्स्प्लोर
Advertisement
FIFA 2018 : इंग्लंडचा हॅरी केन ठरला ‘गोल्डन बूट'चा मानकरी
इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनने विश्वचषकात सर्वाधिक गोल करत ‘गोल्डन बूटाचा’ मान मिळवला. इंग्लंडला या विश्वचषकात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
मॉस्को (रशिया) : फिफा विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनला विश्वचषकात ‘गोल्डन बूट’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हॅरी केनने 6 सामन्यात एकूण 6 गोल करत गोल्डन बूटचा मान मिळवला. इंग्लंडला या विश्वचषकात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना काल (रविवारी) पार पडला. या अंतिम सामन्यात फ्रान्सकडून क्रोएशियाला 4-2 असा पराभव पत्करावा लागला. विश्वचषकच्या अखेरीस स्पर्धेत वेगवेगळ्या स्थरावर सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूला फिफाकडून गौरविण्यात येते. स्पर्धेतील 'गोल्डन बूट' पुरस्कार हा फिफा विश्वचषकतील मानाचा पुरस्कार समजला जातो. इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनने विश्वचषकात सर्वाधिक गोल करत ‘गोल्डन बूटाचा’ मान मिळवला.
विश्वचषकातील हॅरी केनची कामगिरी
हॅरी केनने 6 सामन्यात एकूण 6 गोल करत गोल्डन बूटचा मान मिळवला. तब्बल 32 वर्षानीं इंग्लंडला हा पुरस्कार मिळाल आहे. या आधी 1956 साली गॅरी लिनेकर यांनी गोल्डन बूट पुरस्कार मिळवला होता. हॅरी केनने स्पर्धेत 6 पैकी सर्वाधीक 3 गोल त्याने पनामा संघाविरुद्ध केले. याशिवाय, ट्युनिशिया संघाविरुद्ध त्याने 2 गोल केले, तर कोलंबियाविरुद्ध 1 गोल केला.
फिफा विश्वचषकातील पुरस्कार विजेते
- गोल्डन बूट - कर्णधार हॅरी केन (इंग्लंड)
- गोल्डन बॉल - कर्णधार ल्युका मॉडरिच (क्रोएशिया)
- गोल्डन ग्लोव्ह - थिबो कोर्टुआ (बेल्जियम)
- सर्वोत्तम युवा फुटबॉलवीर - किलियान एमबापेला (फ्रान्स)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement