एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : कोलंबियाचा पहिला विजय, पोलंड गारद
कोलंबियाने पोलंडवर 3-0 ने मात करत यंदाच्या फिफा विश्वचषकात आपला पहिला विजय साजरा केला.

मॉस्को : कोलंबियाने पोलंडवर 3-0 ने मात करत यंदाच्या फिफा विश्वचषकात आपला पहिला विजय साजरा केला. कोलंबियाच्या येरी मीना, फाल्काव आणि युआन क्वाद्रादोनं प्रत्येकी एक गोल डागत कोलंबियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. मीनाने 40 व्या मिनिटाला पहिला गोल करत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 70 व्या मिनिटाला कर्णधार फाल्कावनं गोल करत संघाची आघाडी आणखी भक्कम केली. फाल्कावचा विश्वचषकातील हा पहिला गोल ठरला. क्वाद्रादोनं 75 व्या मिनिटाला तिसरा गोल करत कोलंबियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या सामन्यातील पराभवानंतर पोलंडचं मात्र विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं.
आणखी वाचा























