एक्स्प्लोर

अंडर-17 फिफा वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड आणि स्पेन भिडणार

अंडर सेव्हन्टिन विश्वचषकात इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही दोन्ही संघांची विजेतेपदाची पाटी अद्यापही कोरीच आहे. विश्वचषकाच्या 32 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडनं यावेळी पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

कोलकाता : इंग्लंड आणि स्पेन  याच दोन युरोपियन संघांमध्ये रंगणार आहे फिफा अंडर सेव्हन्टिन विश्वचषकाचा अंतिम सामना. या पार्श्वभूमीवर कोलकत्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर इंग्लंड आणि स्पेन हे दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत. अंडर सेव्हन्टिन विश्वचषकात इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही दोन्ही संघांची विजेतेपदाची पाटी अद्यापही कोरीच आहे. विश्वचषकाच्या 32 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडनं यावेळी पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पेनची मात्र विश्वचषकात दाखल होण्याची ही तब्बल चौथी वेळ आहे. 1991, 2003 आणि 2007 साली स्पेननं अंतिम फेरी गाठली होती. दुर्दैवानं तिन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होत. त्यामुळे यावेळी दोन्ही संघात पहिल्या विजेतेपदासाठीचा संघर्ष फुटबॉल रसिकांना पहायला मिळेल. इंग्लंडनं यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे. साखळी फेरीत ‘फ’ गटात चिली, मेक्सिको, इराक या संघावर मात करत इंग्लंड संघ अव्वल स्थानी राहिला. उपउपांत्यपूर्व फेरीत जपानविरूद्ध गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यात  पेनल्टीवर 5-0 असा विजय मिळवला. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेचा 4-1 आणि उपांत्य सामन्यात ब्राझीलचा 3-1 असा धुव्वा उडवत इंग्लंडनं दिमाखात अंतिम फेरी गाठली. स्पेनच्या कामगिरीवर नजर टाकल्यास साखळी फेरीत ब्राझीलविरूद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता स्पेननं या विश्वचषकातील सर्व सामने जिंकलेले आहेत. बाद फेरीत फ्रान्स, इराक, माली या संघांना पराभवाची धूळ चारत स्पेननं चौथ्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही संघांच्या यंदाच्या विश्वचषकातील कामगिरीची तुलना करता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. इंग्लंडनं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. हे सर्व सामने जिंकताना इंग्लंडच्या खेळाडूंनी तब्बल 18 गोल झळकावले आहेत. तर स्पेननं सहा सामन्यांपैकी  पाच सामने जिंकत 14 गोल्सची नोंद केली आहे. इंग्लंडच्या प्रभावी कामगिरीत स्ट्रायकर रियान ब्रेव्हस्टर महत्वाचा शिलेदार ठरला. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत सर्वाधिक 7 गोल झळकावले आहेत. त्यात उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं अमेरीका आणि उपांत्य सामन्यात तीन वेळच्या विजेत्या ब्राझीलविरूद्ध केलेल्या हॅट्रिकचा समावेश आहे. स्पेनच्या अबेल रूईझची कामगिरीही वाखाणण्याजोगी आहे. त्यानं या विश्वचषकात 6 सामन्यांमध्ये 6 गोल झळकावले आहेत. तर स्पेनच्याच सर्जिओ गोमेझ, सीझर गेलाबर्ट, फेरान टॉरेस यांनीही स्पेनच्या कामगिरीत मोलाची भूमिका बजावली आहे. एकंदरित या युवा खेळाडूंकडून दोन्ही संघांना अंतिम सामन्यातदेखील याच प्रभावी कामगिरीची अपेक्षा राहील. त्यामुळे कोलकत्याच्या सॉल्ट लेक मैदानावर 2017च्या फिफा अंडर सेव्हन्टिन विश्वचषकाच्या विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : पवारांचा पक्ष फोडण्यासाठी गौतम अदानींच्या भावाचा संबंध, संजय राऊतांचा आरोप
Chandrapur Kidney Case : चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणाचे चीन कनेक्शन,SIT च्या तपासा धक्कादायक माहिती
Gautam Adani at Baramati : उद्योगपती गौतम अदानीही बारामतीत दाखल, रोहित पवारांनी केलं गाडीचं सारथ्य
Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
'नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत' मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
'नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत' मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच पहिली यादी; प्रकाश महाजनांनाही नवी जबाबदारी
एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच पहिली यादी; प्रकाश महाजनांनाही नवी जबाबदारी
'प्रत्येक भारतीयाने दक्षिणेकडील एक भाषा शिकली पाहिजे, मी स्वत: शिकण्याचा प्रयत्न करत आहे' देशव्यापी हिंदीचा वरंवटा सुरु असतानाच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानांचा सल्ला
'प्रत्येक भारतीयाने दक्षिणेकडील एक भाषा शिकली पाहिजे, मी स्वत: शिकण्याचा प्रयत्न करत आहे' देशव्यापी हिंदीचा वरंवटा सुरु असतानाच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानांचा सल्ला
Pune Crime Kalyani Komkar : 'आंदेकरांना कोण मदत करतंय मला माहिती नाही, पण त्यांना राजकीय लोक...', बंडू आंदेकरांच्या लेकीचा आक्रमक पवित्रा, नेमकं काय म्हणाल्या?
'आंदेकरांना कोण मदत करतंय मला माहिती नाही, पण त्यांना राजकीय लोक...', बंडू आंदेकरांच्या लेकीचा आक्रमक पवित्रा, नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget