एक्स्प्लोर
श्रीलंकेची अडचण, दिनेश चांदीमल उर्वरित सामन्यांतून आऊट
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत खेळताना अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे दिनेश चांदीमल उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
कॅण्डी : भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत. कसोटी मालिकेनंतर वन डे मालिकाही गमावली, कर्णधारावर दोन सामन्यांची बंदी आणि आता संघातील महत्त्वाचा फलंदाज उर्वरित सामन्यातून बाहेर झाला आहे.
अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे दिनेश चांदीमल उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. श्रीलंकेने वन डे मालिका अगोदरच गमावली आहे. मात्र उर्वरित दोन सामन्यांमध्ये नव्या दमाने उतरण्याआधीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.
अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये दिनेश चांदीमल खेळू शकणार नाही, असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. कोलंबोमध्ये त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत 25 धावांवर असताना हार्दिक पंड्याच्या षटकातील चेंडू चांदीमलच्या अंगठ्यावर लागला. त्यानंतरही त्याने फलंदाजी केली. मात्र 36 धावांवर हार्दिक पंड्याने त्याला माघारी पाठवलं.
भारताविरुद्धच्या या मालिकेत श्रीलंका संघामध्ये दुखापतीचं सत्र सुरुच आहे. यापूर्वीही असेला गुणारत्ने आणि नुवान प्रदीपही दुखापतीमुळे भारताविरुद्ध खेळू शकले नव्हते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement