(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Diego Maradona | डिएगो मॅराडोना यांचं भारताशी काय आहे कनेक्शन?
बार्सिलोनासाठी मॅराडोना यांना एकही युरोपियन कप जिंकता आला नाही. मॅराडोना यांना एकदाच जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून घोषित केले गेले होते.
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. मॅरेडोना यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, त्यांनी 1986 मध्ये अर्जेंटिनाला मॅक्सिको येथील विश्वचषक जिंकवून दिला होता. या स्पर्धेत त्यांनी दोन गोल केले होते जे आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोल्समध्ये मोजले जातात. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंड विरोधात केलेल्या या गोल्सना हँड ऑफ गॉड आणि गोल ऑफ द सेंचुरी नावाने ओळखलं जातं.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मॅरेडोनाला अर्जेंटिनामध्ये हिरो मानले जाते. मॅरेडोनाने 91 सामन्यांत 34 गोल केले. क्लब स्तरावर मॅरेडोनाने 588 सामन्यात 312 गोल केले. बार्सिलोनासाठी मॅराडोना यांना एकही युरोपियन कप जिंकता आला नाही. मॅराडोना यांना एकदाच जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून घोषित केले गेले होते.
11 डिसेंबर 2017 रोजी कोलकाता येथे महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांनी म्हटलं होतं की, मी एक सामान्य फुटबॉलपटू आहे आणि म्हणून मला 'फुटबॉलचा देव' म्हणणे योग्य नाही. या कार्यक्रमात 1986 च्या विश्वचषक करंडकची ट्रॉफी घेतानाच्या मॅरेडोनाच्या 12 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अर्जेंटिनाच्या मीडियाने याबाबत माहिती दिली. मॅराडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅराडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. एका स्कॅनमध्ये मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली. यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मॅराडोना यांची कोरोना टेस्ट देखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आली. 30 ऑक्टोबरला मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते.