एक्स्प्लोर
क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!
मुंबई: टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज आणि केकेआरचा विकेटकिपर रॉबिन उथप्पा लवकरच बाबा होणार आहे. रॉबिनची पत्नी शीतल सध्या गरोदर आहे. शीतलनं स्वत: आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन आपण प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं आहे.
रॉबिन आणि शीतलचं मार्च 2016 मध्ये लग्न झालं होतं. हे त्यांचं पहिलं अपत्य असणार आहे. काही दिवसांपूर्वीचं दोघंही अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करुन आले होते. रॉबिन उथप्पा सुरवातीला कर्नाटकसाठी क्रिकेट खेळत होता. पण आता त्यानं केरळकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉबिन उथप्पानं टीम इंडियासाठी 46 वनडे आणि 13 टी-20 सामने खेळले असून त्यानं दोन्हीमध्ये मिळून 1000 धावा आतापर्यंत केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement