CWG 2022 Day 2 Live Updates: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Commonwealth Games 2022 Live Updates: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे.
LIVE
Background
Commonwealth Games 2022 Live Updates: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी भारताला पदकाची आशा आहे. भारताचे अनेक खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात. दुसऱ्या दिवशी दुपारी 1.30 वाजल्यापासून भारतीय बॅडमिंटन संघ श्रीलंकेविरुद्ध सामना खेळणार आहे. तर, संकेत महादेव आणि गुरुराजा वेटलिफ्टिंगमध्ये नशीब आजमावतील. भारताचा टेबल टेनिस संघ दुपारी 2 पासून गयाना विरुद्ध सामना खेळेल. महिला गटाची ही स्पर्धा असेल. तर पुरुष संघ उत्तर आयर्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे.
मीराबाई चानूकडून दमदार कामगिरीची अपेक्षा
कुशाग्र रावतनं कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतासाठी जलतरणात उत्कृष्ट कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून तो 200 मीटर फ्रीस्टाइलमध्ये आपले कौशल्य दाखवेल. तर बॉक्सिंगमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. मीराबाई चानूकडूनही वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. महिलांच्या 55 किलो गटात ती नशीब आजमणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघ आणि बॅटमिंटन स्पर्धा कधी?
भारताची महिला हॉकीची लढत वेल्सशी होणार आहे. हा सामना रात्री 11.30 पासून होईल. तर बॅडमिंटनमध्ये मिश्र संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना रात्री 11.30 पासून सुरु होईल. लॉन बॉलमध्ये तानिया चौधरीकडून पदकाची आशा असेल.
पदतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 16 सुवर्ण पदकांसह 48 पदके पणाला लागली होती. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियानं 8 सुवर्णांसह 16 पदके जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यजमान इंग्लंड दोन सुवर्ण आणि एकूण 9 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा-
- IND vs WI 1st T20: 'वाटलं नव्हतं भारत...' वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला टी-20 सामना जिंकल्यानंतर रोहितची प्रतिक्रिया
- CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकावर इंग्लंडनं कोरलं नाव, ट्रायथलॉन शर्यतीत दाखवला दम!
- Anahat Singh: अनहत सिंह आहे तरी कोण? जिनं कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदार्पणातच जगावर सोडली छाप!
CWG 2022 Day 2 Live Updates : मीराबाईच पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ 2022 मध्ये पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मीराबाईचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाल, 'विलक्षण मीराबाई चानू. तुम्ही पुन्हा एकदा भारताचा अभिमान वाढवला आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम रचला याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. त्याचे यश अनेक भारतीयांना, विशेषत: नवोदित खेळाडूंना प्रेरणा देते."
CWG 2022 Day 2 Live Updates: भारताला पहिलं गोल्ड! मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं सुवर्णपदक
भारताची दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे.
CWG 2022: भारतानं दुसरं पदक जिंकलं, वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराज पुजारीला कांस्यपदक
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं दुसरं पदक जिंकलंय. वेटलिफ्टिंगच्या 61 किलो ग्रॉम वजन गटात भारताच्या गुरुराज पुजारीनं 269 वजन उचलत भारतासाठी कांस्यपदक जिंकलंय. याआधी संकेत सरगरनं वेटलिफ्टिंगच्या 55 किलोग्रॉम वजन गटात रौप्यपदक जिंकून भारताला पहिलं पदक मिळवून दिलंय.
CWG 2022 Day 2 Live Updates: श्रीहरी नटराजची फायनलमध्ये धडक, पदकाच्या दिशेने यशस्वी वाटचाल
स्विमिंगमध्ये भारताच्या श्रीहरी नटराजने 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे भारताला आणखी एक पदक मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. त्याने सेमीफायनलमध्ये 54.55 सेकंदाचा वेळ घेत सातव्या स्थानावर रहात फायनलमध्ये जागा मिळवली.
CWG 2022 Day 2 Live Updates: भारतीय मिश्र संघानं बॅडमिंटनमध्ये सलग दुसरा सामना जिंकला!
भारताच्या मिश्र संघाची बॅडमिंटनमध्ये चांगली कामगिरी सुरूच आहे. भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 4-0 अशा फरकानं विजय मिळवला. सुमित रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं श्रीलंकेच्या जोडीचा 21-10, 21-13 असा पराभव केला. या विजयासह भारतीय मिश्र संघानं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भारताचा अजून एक सामना बाकी आहे. भारताला आपल्या गटातील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे.