एक्स्प्लोर
Advertisement
Khel Ratna Award 2020 : 'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार
हिटमॅन रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांच्यासह पाच खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थंगावेलू आणि हॉकीपटू राणी यांच्याही नावाचा समावेश आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे. रोहित आणि विनेश फोगाट यांच्याव्यतिरीक्त महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थंगावेलू आणि हॉकीपटू राणी यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे. खेलरत्न मानाचा पुरस्कार मिळवणारा रोहित शर्मा चौथा क्रिकेटपटू आहे.
Cricketer Rohit Sharma, para-athlete Mariappan Thangavelu, table tennis champion Manika Batra, wrestler Vinesh Phogat & hockey player Rani to get Rajiv Gandhi Khel Ratna Award. pic.twitter.com/WwUOrGXqfT
— ANI (@ANI) August 21, 2020
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
रोहित शर्मा - क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा - टेबल टेनिस
विनेश फोगाट - कुस्ती
रानी रामपाल - हॉकी
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)
धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
शिव सिंग - बॉक्सिंग
रोमेश पठानिया - हॉकी
क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया - कुस्ती
द्रोणाचार्य पुरस्कार
ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
योगेश मालवीय - मल्लखांब
जसपाल राणा - नेमबाज
कुलदीप कुमार हांडू - वुशू
गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन
अर्जुन पुरस्कार
ईशांत शर्मा - क्रिकेट
दीप्ती शर्मा - क्रिकेट
अतनू दास - तिरंदाजी
द्युती चंद - अॅथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
अजय सावंत - घोडेस्वारी
संदेश जिंगन - फुटबॉल
अदिती अशोक - गोल्फ
आकाशदीप सिंग - हॉकी
दिपिका - हॉकी
दीपक हुडा - कबड्डी
सारिका काळे - खो खो
दत्तू भोकनळ - रोईंग
मनू भाकर - नेमबाजी
सौरभ चौधरी - नेमबाजी
मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
दिविज शरण - टेनिस
शिवा केशवन - हिवाळी खेळ
दिव्या काकरान - कुस्ती
राहुल आवारे - कुस्ती
सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
संदीप - पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल - पॅरा नेमबाज
याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. सचिनला 1998 साली, धोनीला 2007 तर विराटला 2018 साली हा पुरस्कार मिळाला होता. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत या रोहित, विनेश फोगाटसह अन्य दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 2019 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माने 5 शतकं झळकावत स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यामुळे बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं.
धोनीच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदीही भावूक; पत्र लिहून भावना व्यक्त
एकदिवसीय प्रकारात रोहित शर्माचा रेकोर्ड चांगला आहे. 50 ओवरच्या फॉर्मेटमध्ये 2019 सालात सर्वाधिक रन काढण्यात रोहितचा नंबर पहिला आहे. रोहितने सात शतकांसह 1,490 रन आपल्या खात्यात जमा केले आहे.
MS Dhoni Future Plan | निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनीची शेतातल्या शिवारात इनिंग!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement