एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Womens T20 WC : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भारतीय महिला संघाला मोलाचा सल्ला
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने धडक मारल्याने अभिनंदन केलं आहे.
मुंबई : भारतीय महिला संघ ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने हरमनप्रीत कौर आणि भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. सचिन तेंडुलकरने त्यांना सामन्यात सकारात्मक विचारांसह सर्वोतकृष्ठ खेळ करण्य़ाचा सल्ला दिला. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा भारत आणि इंग्लंड संघांमधला उपांत्य सामना पावसामुळं एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. त्यानंतर साखळीतल्या सर्वोत्तम कामगिरीच्या निकषावर भारतीय संघाला फायनलचं तिकीट देण्यात आलं. आता भारताचा सामना 8 मार्च रोजी मेलबर्नला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
एका कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरने महिला संघाला मोलाचे सल्ले दिले. त्यावेळी सचिनने “आपल्या आत्तापर्यंतच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यात सर्वोतकृष्ठ खेळा. भारतात तुम्हाला या ट्राफीसह पाहयला आवडेल” असा सल्ला दिला. कोणत्याही दबावाखाली खेळू नका, असे म्हणत सचिनने हे फक्त बोलणं सोप असल्याचंही सांगितलं. तसेच तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळ करा, मैदानावर एकजूट होऊन सर्वोत्कृष्ट खेळ करा असा मोलाचा सल्ला सचिने या कार्यक्रमादरम्यान भारतीय महिला संघाला दिला.
Women's T20 World Cup | भारतीय संघाची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी होणार अंतिम मुकाबला
दरम्यान भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने धडक मारल्याने अभिनंदन केलं आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय महिलांनी आजवर कधीही फायनलमध्ये धडक मारलेली नव्हती. फायनलच्या या उंबरठ्यावर भारतासमोर लागोपाठ दुसऱ्यांदा इंग्लंडचं आव्हान होतं. 2018 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात इंग्लंडनं भारताचं आव्हान उपांत्य फेरीतंच संपुष्टात आणलं होतं. पण त्याआधीही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला इंग्लंडला कधीच हरवता आलेलं नव्हतं. इंग्लंडचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला भारताविरुद्धचा रेकॉर्ड हा 5-0 असा आहे. यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघ अजिंक्य होता, पण इंग्लंडने 2009, 2012, 2014, 2016 आणि2018च्या विश्वचषकात भारताला हरवले होते.टीम इंडियासाठी मिताली राज साडी नेसून मैदानात, व्हिडीओ व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
क्रीडा
राजकारण
Advertisement