(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WI vs IND T20: भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, स्फोटक फलंदाजांचं संघात कमबॅक
WI vs IND T20 Series: एकदिवसीय मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ टी-20 मालिकेसाठी (West Indies vs India) सज्ज झालाय.
WI vs IND T20 Series: एकदिवसीय मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ टी-20 मालिकेसाठी (West Indies vs India) सज्ज झालाय. भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं (CWI) 16 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. टी-20 मालिकेत निकोलस पूरन वेस्ट इंडीजच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघात बऱ्याच खेळाडूंचं पुनरामन झालय.ज्यात स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर, ओडेन स्मिथ व ओबेद मेकॉय यांचा समावेश आहे. एकदिवसीय मालिकेत मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरणार आहे.
ट्वीट-
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 29 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा टी-20 सामना | 1 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
तिसरा टी-20 सामना | 2 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
चौथा टी-20 सामना | 6 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
पाचवा टी-20 सामना | 7 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
भारताविरुद्ध वेस्ट इंडीजचा टी-20 संघ
निकोलस पूरन (कर्णधार), शामराह ब्रूक्स, ब्रेंडन किंग, कायले मायर्स, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), डोमेनिक ड्रेक्स, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, जेसन होल्डर, ओबेद मेकॉय, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, शिमरन हेटमायर, किमो पॉल, हेडन वॉल्श, डेवॉन थॉमस.
वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.)
हे देखील वाचा-
- CWG 2022 Opening Ceremony: कॉमनवेल्थ स्पर्धेचा शुभारंभ; पीव्ही सिंधू, मनप्रित सिंहकडं भारतीय चमूचं नेतृत्व
- WI vs IND T20 Series: चहलला विश्रांती, जाडेजाच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह; कोणाला मिळणार संधी?
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थसाठी सज्ज, 'या' 5 महिला क्रिकेटपटू मिळवून देऊ शकतात सुवर्णपदक