CWG 2022 Opening Ceremony: कॉमनवेल्थ स्पर्धेचा शुभारंभ; पीव्ही सिंधू, मनप्रित सिंहकडं भारतीय चमूचं नेतृत्व
CWG 2022 Opening Ceremony: इंग्लंडमधील (England) बर्मिंगहॅम शहरात (Birmingham) अलेक्झांडर स्टेडियमवर आजपासून 8 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडलाय.
CWG 2022 Opening Ceremony: इंग्लंडमधील (England) बर्मिंगहॅम शहरात (Birmingham) अलेक्झांडर स्टेडियमवर आजपासून 8 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडलाय. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंह (Manpreet Singh) यांनी भारतीय चमूचं नेतृत्व केलं.या स्पर्धांना सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलीय.
रॉयल नेव्हीनं कॉमनवेल्थ स्पर्धेचा ध्वज फडकवला
उद्घाटन समारंभात रॉयल नेव्हीने कॉमनवेल्थ स्पर्धेचा ध्वज फडकवला. आता हा ध्वज पुढील 11 दिवस फडकणार आहे. कॉमनवेल्थ उद्घाटन सोहळ्यात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघानं अलेक्झांडर स्टेडियमवर मार्चपास्टला सुरुवात केली. यानंतर कुक बेटे आणि फिजीचा नंबर आला. दरम्यान, नोबेल पारितोषिक विजेता मलाला यूयुफजई स्टेडियममध्ये दाखल झाल्या. पाकिस्तानमध्ये गोळी लागल्यानंतर त्यांच्यावर बर्मिंगहॅम येथे उपचार करण्यात आले होते. यामुळं हा त्यांच्यासाठी अतिशय भावूक क्षण आहे. यजमानसंघ इंग्लंड मार्च पास्टमध्ये सर्वात शेवटी उतरला.
6 हजार 500 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल
कॉमनवेल्थ स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्याला इंग्लंडच्या प्रिंस चार्ल्सनं संबोधित केलं. याबरोबरच खेळालाही सुरुवात झालीय. आजपासून पुढील 11 दिवस जगातील 72 देशांतील खेळाडू आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतील. ही स्पर्धा 8 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. यावेळच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 283 वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. 72 संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे 6 हजार 500 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची आतापर्यंतची पदकांची कमाई
भारत आठराव्यांदा कॉमनवेल्थ स्पर्धेचा भाग बनत आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 503 पदकांची कमाई केलीय. ज्यात 181 सुवर्ण, 173 रौप्य आणि 149 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत 2022 मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक कॉमनवेल्थ स्पर्धेत पदकांच्या बाबतीत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आलाय.
हे देखील वाचा-
- WI vs IND T20 Series: चहलला विश्रांती, जाडेजाच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह; कोणाला मिळणार संधी?
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थसाठी सज्ज, 'या' 5 महिला क्रिकेटपटू मिळवून देऊ शकतात सुवर्णपदक
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिलांचा कॉमनवेल्थमधील आज पहिला सामना, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच कधी, कुठे पाहाल?