Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थसाठी सज्ज, 'या' 5 महिला क्रिकेटपटू मिळवून देऊ शकतात सुवर्णपदक
Team India CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून यंदा महिला क्रिकेट सामने होणार असल्याने भारतीय महिला क्रिकेट संघही यावेळी स्पर्धेत सहभागी होत आहे.
Indian Women's Cricket Team Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धेला सुरुवात झाली असून आज (29 जुलै) भारताचा पहिला सामना खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. दरम्यान सर्व सामने बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात खेळवले जाणार असून यावेळी भारतीय संघातील खास पाच खेळाडूंवर अधिक जबाबदारी असणार आहे. या पाच जणी उत्तम खेळल्यास भारत नक्कीच सुवर्णपदकाला गवसणी घालेल. तर या पाच जणी म्हणजे संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शेफाली शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांचा समावेश आहे.
1.शेफाली वर्मा - टीम इंडियाची सलामीवीर शेफाली वर्माने खूप कमी वेळेत स्फोटक फलंदाजीने नाव कमवलं आहे. तिने अनेक सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन केलं आहे. शेफालीने टी20 विश्वचषक 2020 मध्ये सर्वाधिक रन केले. यामध्ये 5 सामन्यात तिने 163 रन केले. त्यामुळे तिच्याकडून संघाला बरीच अपेक्षा असेल.
2.हरमनप्रीत कौर - या यादीतील महत्त्वाचं नाव म्हणजे हरमनप्रीत कौर. कर्णधारपदाची जबाबदारी कौरवर असताना तिची फलंदाजीही सर्वांना परिचित आहे. अशामध्ये तिने आतापर्यंत 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळल्याने तिच्या अनुभवाचा संघाला होईल.
3.दीप्ती शर्मा - टी20 तसंच एकदिवसीय अशा दोन्ही फॉर्मेटमध्ये दमदार प्रदर्शन दाखवणाऱ्या दीप्ती शर्माचं अष्टपैलू प्रदर्शन संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ती कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी हुकूमाचा एक्का असणार आहे. ती फिरकीपटू तसंच स्फोटक फलंदाज आणि उत्तम फिल्डरही आहे.
4.स्मृती मंधाना - भारतीय महिला क्रिकेटसह जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणजे स्मृती मंधाना. तिच्या सलामी फलंदाजीचा भारताला मोठा फायदा होऊ शकतो. तिने आतापर्यंत भारतासाठी बऱ्याच सामन्यात बक्कळ रन करुन चांगली सुरुवात करुन दिली आहे. कॉमनवेल्थमध्येही तिच्याकडे सर्वांचं लक्ष असेल.
5. राजेश्वरी गायकवाड - भारतीय संघातील महत्त्वाची खेळाडू म्हणजे फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड. राजेश्वरीच्याफिरकीची जादू चालणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थ सर करण्यासाठी सज्ज, कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघात महामुकाबला, कधी, कुठे पाहाल सामना?