(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WI vs IND T20 Series: चहलला विश्रांती, जाडेजाच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह; कोणाला मिळणार संधी?
एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला 3-0 असं नमवल्यानंतर भारतीय संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झालाय. भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs WI) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होईल.
WI vs IND T20 Series: एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला 3-0 असं नमवल्यानंतर भारतीय संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झालाय. भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs WI) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) विश्रांती देण्यात आली आहे. तर, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळं वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
युजवेंद्र चहलला विश्रांती
वेस्ट इ़ंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत युजवेंद्र चहलनं दमदार गोलंदाजी केली. वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात युजवेंद्र चहलनं 17 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. ज्यामुळं भारताला वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमीवर क्लीन स्वीप देण्यात यश आलं. परंतु, टी-20 मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली.
रवींद्र जाडेजाची दुखापत चिंता वाढवणारी
जाडेजाच्या फिटनेसमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. रवींद्र जडेजाही फिट नाही. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळेल अशी अपेक्षा होती मात्र तो मैदानात उतरू शकला नाही.रवींद्र जडेजा अजूनही 100 टक्के तंदुरुस्त नसल्यानं तो वेस्ट इंडीजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळू शकलेला नाही. तो सध्या उपचार घेत आहे. जडेजाच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिलेल्या अपडेटमुळं आजपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेतूनही तो बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता
यजुर्वेद्र चहलला विश्रांती आणि रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. यामुळं पहिल्या टी-20 सामन्यात अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला पुनरागमनाची संधी मिळू शकेल. अश्विननं गेल्या नोव्हेंबरपासून टी-20 सामना खेळलेला नाही. मात्र, आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने त्याला या मालिकेसाठी संघात स्थान मिळालंय. त्याच्यासह कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई या फिरकीपटूंचे पर्याय भारताकडं आहेत. वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल सांभाळतील. एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ टी-20 मालिकेत कशी कामगिरी बजावतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा टी-20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.)
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थसाठी सज्ज, 'या' 5 महिला क्रिकेटपटू मिळवून देऊ शकतात सुवर्णपदक
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिलांचा कॉमनवेल्थमधील आज पहिला सामना, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच कधी, कुठे पाहाल?
- T20 World Cup : पाकिस्तानची टी20 विश्वचषकातील कामगिरी 'या' एका गोष्टीवर अवंलंबून, रिकी पॉटिंग स्पष्टच बोलला