ICC T20 World Cup: युएईसह आयर्लंडचा संघ टी20 विश्वचषकासाठी सज्ज, 2022 टी20 विश्वचषकासाठी पात्र
ICC T20 World Cup: टी20 विश्वचषकाला काही महिने शिल्लक असून पात्रता फेरीचे सामने पार पडले. युएई आणि आयर्लंड संघाने नुकतीच या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
ICC T20 World Cup:आगामी टी20 विश्वचषकापूर्वी नुकतेच पात्रता फेरीचे सामने (T20 World Cup Global Qualifier) पार पडले आहेत. या सामन्यांमध्ये क्वलीफार ए मध्ये अप्रतिम कामगिरी करत युएई आणि आयर्लंड या संघाने विश्वचषक स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. युएईने नेपाळला तर आयर्लंडने ओमान क्रिकेट संघाला मात देत विश्वचषकात पात्रता मिळवली आहे.
या दोन संघाखेरीज अफगाणिस्तान, बांग्लादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय T20 स्वरूपातील दमदार कामगिरीमुळे टी20 विश्वचषक स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. त्यानंतर आता क्लॉलीफायर ए मध्ये विश्वचषकात पात्रता मिळवण्यासाठी सुरु असलेल्या पात्रता फेरीच्या सेमीफायनलमध्ये आयर्लंडने ओमान क्रिकेट संघाला 56 धावांनी मात देत विश्वचषकात पात्रता मिळवली. तर युएईने नेपाळला 68 धावांनी मात देत विश्वचषक स्पर्धेत जागा मिळवली आहे.
टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज
टी20 विश्वचषक 2022 ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर, 2022 दरम्यान खेळवली जाणार आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलियातील सहा ठिकाणी या स्पर्धेतील सामने आयोजित करण्यात आले असून यामध्ये अॅडलेड, ब्रिस्बेन, गिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान उपांत्य फेरीचे सामने सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि अॅडलेड ओव्हल येथे होतील आणि अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. मागील वर्षीचा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने यजमान म्हणून आधीच पात्रता मिळवली आहे.
हे ही वाचा -
- ICC T20 Rankings : टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्था
- Gujarat Titans Logo: गुजरात टायटन्सचा लोगो रिलीज, हार्दिक पांड्या दिसला अनोख्या अंदाजात
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha