South Africa vs India : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर; कधी होणार पहिला सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी जोहान्सबर्ग येथे 17 ते 21 डिसेंबर, दुसरी कसोटी 26 ते 30 डिसेंबर आणि तिसरी कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळली जाईल.
South Africa vs India : भारतीय क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया तीन सामन्यांची कसोटी, तीन सामन्यांची एकदिवसीय आणि चार सामन्यांची टी -20 मालिका खेळणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ही माहिती दिली.
ऑल-फॉरमॅट मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे आणि त्यानुसार भारत या दौऱ्यात तीन कसोटी, एकदिवसीय आणि चार टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी जोहान्सबर्ग येथे 17 ते 21 डिसेंबर, दुसरी कसोटी 26 ते 30 डिसेंबर आणि तिसरी कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळली जाईल. तीन सामन्यांची ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे आणि नंतर चार सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाईल.
भारताने अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही
टीम इंडियाने अद्याप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र भारतीय संघाचे सध्याचा फॉर्म पाहता, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारत प्रथमच कसोटी मालिका जिंकू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भारताचा 2018 मध्ये शेवटचा दक्षिण आफ्रिका दौरा
विशेष म्हणजे, भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा दौरा केला. या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र एकदिवसीय आणि टी -20 मालिका भारताने जिंकली होती. भारताने दक्षिण आफ्रिकेत प्रथमच वनडे आणि टी -20 मालिका जिंकली होती.
इतर बातम्या