एक्स्प्लोर

Shardul Thakur at Mumbai Mantralaya : क्रिकेटर शार्दूल ठाकूर मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, नेमकं कारण काय?

Shardul Thakur : भारताचा युवा स्टार अष्टपैलू क्रिकेटर शार्दूल ठाकूर मुंबई मंत्रालय येथे पोहोचला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं आहे.

Shardul Thakur News : भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हा मुंबई मंत्रालयात आला असून शार्दूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शार्दूलचं मुख्यमंत्र्यांना भेटण्यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही, पण तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असून मुख्यमंत्र्यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तो मंत्रालयात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याशिवाय पालघर भागातील क्रिकेट मैदानांची दुरवस्था आणि ग्रामीण भागात क्रिकेटला चालना मिळावी. या बाबतही शार्दूल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं समोर येत आहे.

लवकरच लग्नबंधनात अडकणार शार्दूल

नुकताच सलामीवीर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न पार पडलं असून आता शार्दूलही लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचा साखरपुडा मुंबई येथे पार पडला होता. शार्दूल गर्लफ्रेंड मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहे. शार्दूलच्या लग्नाबाबत त्याची जोडीदार अर्थात भावी पत्नी मितालीनेच काही दिवसांपूर्वी दिली होती. मितालीने सांगितले होते की, "लग्नाचा सोहळा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात 200-250 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शार्दुल टीम इंडियाच्या शेड्यूलमुळे व्यस्त असल्याने लग्नाची सर्व तयारी मी करत आहे. शार्दुल लग्नाच्या दिवशीच कार्यक्रमाला पोहोचणार आहे." पुढे बोलताना मितालीने सांगितले की, "लग्नाचे मुख्य कार्यक्रम कर्जतमध्ये होणार आहेत. याआधी आम्ही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलं होतं पण लॉजिस्टिक आणि खूप लोकांमुळे सगळ्या व्यवस्थेत खूप अडचणी आल्या असत्या. या कारणामुळे आम्ही कर्जतमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे."

कोण आहे शार्दूलची पत्नी?

शार्दुलची होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे.  तर पालघरचा असणारा शार्दूल आधी आयपीएलमधून सर्वांसमोर आला होता. सुरुवातीला काही संघातून खेळण्यानंतर धोनीच्या कॅप्टन्सीखाली चेन्नई सुपरकिंगमध्ये शार्दूलचा खेळ खऱ्या अर्थाने बहरला. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर तिथेही त्याने आपली खास जागा बनवली. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत मिळून ठोकलेलं एक अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं. त्यामुळेच भारत मालिकाही जिंकला होता. त्यानंतर मर्यादीत षटकातही चमकदार कामगिरी करणारा शार्दूल एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात आहे. संघाला विकेटची गरज असताना विकेट घेणारा आणि अडचणीच्या काळात फलंदाजी सांभळणारा अशी शार्दूलची ओळख आहे. शार्दूलने तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं आहे. दरम्यान, 2021 नोव्हेंबरमध्ये शार्दूलचा साखरपुडा झाला असून त्याचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shardul Thakur Wedding : 'लॉर्ड' शार्दूल लवकरच अडकणार लग्नबंधनात! कर्जतमध्ये होणार विवाह सोहळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Embed widget