एक्स्प्लोर

T20 World Cup : रिंकू सिंहला विश्वचषकात संधी नाही, इरफान पठाणच्या भुवया उंचावल्या; दिग्गजांकडून खंत व्यक्त

T-20 World Cup: टी-20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होत असून रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे

टीम इंडियाने विश्वचषक टी-20 स्पर्धेतील (T20 World cup) पहिल्याच हंगामात धमाकेदार कामगिरी करत विश्वविजयाचा मान पटकावला होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारताने 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप उंचावला. त्यानंतर, भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. यंदाच्या 2024 च्या टी-20 वर्ल्डकप सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया पुन्हा विश्विवजयाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने (BCCI) टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यामध्ये, कर्णधार पदाची धुरा रोहित शर्माकडे सोपविण्यात आली असून हार्दीक पांड्याला उपकर्णधार बनविण्यात आले आहे. मात्र, आयपीएल (IPL) आणि टी-20 सामन्यात अफलातून फलंदाजी करुन क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केलेल्या रिंकु सिंगला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे, सोशल मीडियातून त्याचे चाहते व क्रिकेटप्रेमींची नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येते.

टी-20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होत असून रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जच्या शिवम दुबेला भारतीय संघात संधी मिळआली आहे. गुणवत्ता आणि कामगिरी या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरुनही आतापर्यंत फारशी संधी न मिळालेल्या संजू सॅमसनलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तर, चहलची टीमवापसी झाली. तर शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान यांचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, रिंकू सिंहला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने सोशल मीडियातून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, रिंकूच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

इरफान पठाणचे ट्विट

टीम इंडियाचा माजी जलगती गोलंदाज इरफाण पठाण यानेही ट्विट करुन रिंकू सिंहला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड करताना रिंकू सिंहच्या अलीकडच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे ट्विट इरफान पठाणने केले आहे. इरफानने एकप्रकारे रिंकू सिंहला संधी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केल्याचं दिसून येत. रिंकूला पहिल्या 15 मध्येही स्थान मिळालं नसून राखीव खेळाडूंमध्ये रिंकूची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, सोशल मीडियातही रंगली चर्चा आहे.

दरम्यान, रिंकू सिंहला संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोलकाता नाईट रायडर्समधून आपल्या अफलातून फटकेबाने रिंकू क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केलं आहे. बिग फिनीशर म्हणून रिंकू नावारुपाला आला असून शाहरुख खाननेही त्याच्या खेळाचं कौतुक केलंय. मात्र, रिंकूला टी-20 विश्वचषकात संधी न मिळाल्याने सोशल मीडियातूनही नेटीझन्स प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा

T20 World Cup 2024 : रोहितच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकण्याची पुन्हा संधी; 2023 च्या पराभवाचा वचपा काढणार

 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Team India Women's Asia Cup : टीम इंडिया चॅम्पियन झाली तरी रिकाम्या हाताने परतणार? ट्रॉफी-पैशांबाबत धक्कादायक माहिती समोर
टीम इंडिया चॅम्पियन झाली तरी रिकाम्या हाताने परतणार? ट्रॉफी-पैशांबाबत धक्कादायक माहिती समोर
Team India News : अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; आणखी एका दिग्गजाने सोडली साथ, BCCIकडे दिला राजीनामा
अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; आणखी एका दिग्गजाने सोडली साथ, BCCIकडे दिला राजीनामा
Kuldeep Yadav News : कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
Ind vs Ban W Asia Cup Semi Final : आशिया कपचा इतिहास-भूगोल बदलून टाकणारा सामना! भारत-बांगलादेशच्या सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं? ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती!
आशिया कपचा इतिहास-भूगोल बदलून टाकणारा सामना! भारत-बांगलादेशच्या सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं? ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती!

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल, अभिजीत दीपके यांचा सरकारला इशारा
सरकारनं 'तो' प्रयत्न करु नये, मनोज जरांगेना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल : अभिजीत दीपके
Manoj Jarange: जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार, म्हणाले, काड्या कशाला लावतो; घाणेरडी भाषा अन् जिल्हाधिकाऱ्यांवरही बोलले
जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार, म्हणाले, काड्या कशाला लावतो; घाणेरडी भाषा अन् जिल्हाधिकाऱ्यांवरही बोलले
Crime News: आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला,
आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला, "मला पश्चात्ताप नाही, मी बाहेर गेल्यावर तिच्या 'शुगर डॅडी'लाही..."
Aaditya Thackeray : MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल, आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल, आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
Accident News: महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
Manoj Jarange: टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
FDA Action In Pune : खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
Top 10 Billionaires: जगातील अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर  
अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर   
Embed widget