एक्स्प्लोर
Venkatesh Iyer : टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत, इकडे युवा खेळाडूनं सुरु केली नवी इनिंग, व्यंकटेश अय्यर अडकला विववाहबंधनात
IPL 2024: कोलकाता नाइट राइडर्सचा आणि टीम इंडियाचा खेळाडू व्यंकटेश अय्यर बंगळुरुत विवाहबंधनात अडकला आहे. केकेआरला विजेतपद मिळवून देण्यात व्यंकटेश अय्यरनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.
व्यंकटेश अय्यर अडकला विवाहबंधनात
1/5

कोलकाता नाईट रायडर्स आणि टीम इंडियाचा खेळाडू व्यंकटेश अय्यरनं नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. व्यंकटेश अय्यर बंगळुरुत विवाहबंधनात अडकला आहे. व्यंकटेश अय्यरनं श्रती रघुनाथन हिच्याशी लग्न केलं. बंगळुरुत दोघे विवाहबंधनात अडकले.
2/5

व्यंकटेश अय्यर आणि श्रृती रघुनाथन यांचा नोव्हेंबर 2023 साखरपुडा झाला होता. आज दोघेही विवाहबंधनात अडकले. यावेळी दोघांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. व्यंकटेश अय्यरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 02 Jun 2024 04:13 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















