AUS vs AFG : ऑस्ट्रेलियाला लोळवलं, आता अफगाणिस्तानकडे फायनलमध्ये जाण्याची संधी, दिग्गज क्रिकेटपटूनं गणित मांडलं..
T20 World Cup 2024 : अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
सेंट लूसिया : अफगाणिस्ताननं टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. अफगाणिस्ताननं (AUS vs AFG) ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी 149 धावांचं आव्हानं ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 127 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानच्या विजयानं सुपर 8 मधील ग्रुप 1 मधून सेमी फायनलमध्ये कोण पोहोचणार याबाबतचा तिढा वाढला आहे. अफगाणिस्तानच्या विजयाबद्दल सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. कॅप्टन राशिद खानवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं देखील अफगाणिस्तानचं कौतुक केलं आहे. अफगाणिस्तानच्या संघाला टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक देण्याची चांगली संधी असल्याचं मायकल वॉनन म्हटलं आहे.
अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत केल्यानंतर राशिद खानच्या नेतृत्त्वातील टीमनं जोरदार जल्लोष केला. यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन यानं अफगाणिस्तानचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. यावेळी अफगाणिस्तानला अंतिम फेरीत पोहोचण्याची चांगली संधी आहे, असं त्यांनी म्हटलं.
मायकल वॉन यांचं ट्विट
Great win for Afghanistan .. they have a genuine chance now of reaching the final .. They will fancy beating any of the teams in the other group in Trinidad with their bowling attack .. #T20WorldCup
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 23, 2024
अफगाणिस्तानचा संघ त्रिनिदाद मध्ये कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो. गोलंदाजीच्या जोरावर ते शक्य करु शकतात, असं मायकल वॉन यांनी म्हटलं. आपण जे पाहिलं त्यात धक्कादायक असं काहू नव्हतं. राशिद खानच्या नेतृत्त्वातील संघानं चांगली कामगिरी केली आहे. कौशल्यपूर्ण खेळाडूंचा समावेश अफगाणिस्तानकडे आहे. याशिवाय राशिद खान देखील चांगल्या प्रकारे नेतृत्त्व करत आहे, असं मायकल वॉन म्हणाले.
ग्रुप 1 मधील समीकरण बदलणार
अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत केलं. अफगाणिस्तानच्या या विजयाचं श्रेय त्यांच्या सलामीवीरांची फलंदाजी, गुलबदीन नैब आणि नवीन उल हक यांच्या गोलंदाजीला जातं. रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम जरदान यांच्या 118 धावांच्या भागिदारीनं अफगाणिस्तानच्या विजायाचा पाया रचला. अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा डाव 127 धावांवर संपवत विजय मिळवला.
अफगाणिस्तानच्या विजयामुळं सुपर 8 च्या ग्रुप 1 मधून उपांत्य फेरीत कोण प्रवेश करणार यासंदर्भात आंदाज बांधले जात आहेत. भारताच्या नावावार 4 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नावावार 2 गुण असून अफगाणिस्तानच्या नावावर देखील 2 गुण आहेत. नेट रनरेटच्या आधारे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास अफगाणिस्तानला सेमी फायनमध्ये पोहोचण्याची संधी मिू शकतं. मात्र, अफगाणिस्तानला देखील बांगलादेशला पराभूत करावं लागेल.
संबंधित बातम्या :
AFG vs AUS अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली, मॅच कुठं फिरवली, जाणून घ्या टर्निंग पॉइंट