IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम!
IND vs SA Final : अख्या विश्वचषकात फ्लॉप जाणाऱ्या विराट कोहलीने फायनलमध्ये जलवा दाखवला. किंग कोहलीने बार्बाडोसमध्ये टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये 76 धावांची खेळी केली.
IND vs SA Final : अख्या विश्वचषकात फ्लॉप जाणाऱ्या विराट कोहलीने फायनलमध्ये जलवा दाखवला. किंग कोहलीने बार्बाडोसमध्ये टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये 76 धावांची खेळी केली. विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने 176 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने यंदाच्या टी20 विश्वचषकात सात डावात 75 धावा केल्या होत्या. विराट कोहलीवर टीका केली जात होती, पण फायनलमध्ये किंगने टीकाकारांना उत्तर दिलं. कोहलीने 76 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. पण विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. टी20 विश्वचषकात सर्वात संथ अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता विराट कोहलीच्या नावाचाही समावेश झालाय. या यादीमध्ये पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान अव्वल स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवचाही या यादीत समावेश आहे.
टी20 विश्वचषकातील सर्वात संथ अर्धशतक
टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाद संथ अर्धशतकाचा पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. रिझवानने याच विश्वछ,कात कॅनडाविरोधात 52 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले होते. दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेविड मिलर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने याच विश्वचषकात नेदर्लंड्सविरोधात 50 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. वेस्ट इंडिजचा डेवॉन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा डेविड हसी आणि भारताचा सूर्यकुमार यादव यांचाही यादीत समावेश आहे. या तिघांनी 49 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलेय. यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. विराट कोहलीने टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये 48 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले आहे.
टी20 विश्वचषकातील सर्वात संथ अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी
मोहम्मद रिज़वान (पाकिस्तान) - 52 चेंडू
डेविड मिलर (दक्षिण अफ्रीका - 50 चेंडू
डेवोन स्मिथ (वेस्ट इंडीज) - 49 चेंडू
डेविड हसी (ऑस्ट्रेलिया) - 49 चेंडू
सूर्यकुमार यादव (भारत) - 49 चेंडू
विराट कोहली (भारत) - 48 चेंडू
सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम भारताच्या नावावर -
टी20 विश्वचषकात सर्वात वेगवानअर्धशतक ठोकण्याचा विक्रम भारताच्या युवराज सिंहच्या नावावर आहे. युवराज सिंह याने 2007 च्या विश्वचषकात इंग्लंडविरोधात फक्त 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. युवराजने या खेळीदरम्यान एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. आजही युवराजचा हा विक्रम अबादित आहे. नेदर्लंड्सचा एसजे मायबर्ग यानं 2014 टी20 विश्वचषकात 17 चेंडूत अर्धशतक ठोकले.
विराटचं संयमी अर्धशतक -
2024 विश्वचषकाच्या फायनलमध्ये विराट कोहलीने आपला अनुभव झोकत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने 76 धावांची खेळी करत भारतीय संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. सुरुवातीला लागोपाठ विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. त्यानं एकेरी दुहेरी धावसंख्या काढत डावाला आकार दिला. अक्षर पटेल याच्यासोबत आधी निर्णायक 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात शिवम दुबे याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. अर्धशतक ठोकण्यासाठी विराट कोहलीने 48 चेंडू घेतले, पण त्यानंतर चौकार-,ठकारांचा पाऊस पाडला. विराट कोहलीने 59 चेंडूमध्ये दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 46 धावा चोपल्या.