एक्स्प्लोर
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
Rohit Sharma T20 World Cup 2024 Winner : भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
रोहित शर्माचं अनोखं सेलिब्रेशन
1/5

रोहित शर्मानं भारतानं टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मानं उपकॅप्टन हार्दिक पांड्याला त्याच्या कामगिरीबद्दल कौतुक म्हणून किस केलं. हार्दिकनं क्लासेन आणि मिलरची विकेट घेतली.
2/5

रोहित शर्मानं पत्नी रितिका सचदेव हिला विजयानंर मिठी मारत विजय साजरा केला.
3/5

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, भारताला विजेतेपद मिळालं नव्हतं. अखेर रोहितच्या टीम इंडियानं अपयश पुसून टाकलं आहे. भारतानं 7 धावांनी मॅच जिंकली.
4/5

विराट कोहलीवर रोहित शर्मानं विश्वास टाकला होता. अखेरच्या मॅचमध्ये रोहित , रिषभ अन् सूर्यकुमार लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं केलेल्या 76 धावा गेमचेंजर ठरल्या. रोहितनं विराटला मिठी मारली.
5/5

रोहित शर्मानं बारबाडोसच्या स्टेडियमवर नतमस्तक होत तिथूनच भारतमातेला वंदन केलं.
Published at : 30 Jun 2024 01:06 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
























