Jimmy Neesham: न्यूझीलंडच्या जिमी नीशमची थेट एमएस धोनीशी तुलना, सेमीफायनलमधील 'या' दृष्यांनी वेधलं सर्वांच लक्ष
Jimmy Neesham: उपांत्य फेरीचा दुसरा सामना पाकिस्तान- ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी अंतिम सामना खेळणार आहे.
![Jimmy Neesham: न्यूझीलंडच्या जिमी नीशमची थेट एमएस धोनीशी तुलना, सेमीफायनलमधील 'या' दृष्यांनी वेधलं सर्वांच लक्ष T20 World Cup 2021: Jimmy Neesham Explains Why He Wasn't Celebrating After New Zealand Beat England In Semi-Final Clash Jimmy Neesham: न्यूझीलंडच्या जिमी नीशमची थेट एमएस धोनीशी तुलना, सेमीफायनलमधील 'या' दृष्यांनी वेधलं सर्वांच लक्ष](https://wcstatic.abplive.in/en/prod/wp-content/uploads/2019/01/Id26BriTTV.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिलीय. उपांत्य फेरीत इंग्लंडच्या संघानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. न्यूझीलंडनं हे लक्ष्य 5 विकेट्स राखून पूर्ण केलंय. पंरतु, न्यूझीलंडच्या या विजयानंतर सोशल मीडियावर जिमी नीशमच्या (Jimmy Neesham) नावाची चर्चा सुरु झालीय. एवढेच नव्हे तर, त्याची थेट महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) तुलना केली जात आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात नेमकं असं काय घडलं? ज्यामुळं जिमी नीशमला न्यूझीलंडचा धोनी असं म्हटलं जातंय. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जिम्मी निशमचा या विजयात मोलाचा वाटा होता. त्यानं 11 बॉलमध्ये 27 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. हा सामना जिंकताच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी डगआउटमध्ये एकच जल्लोष केला. मात्र, तरीही नीशम एकदम शांत बसला होता. आपल्या खुर्चीवरून जराही उठला नाही. पॅड बांधून पाय पसरवून एकाच स्थितीत बसला होता. नीशमचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तर काही जणांनी त्याची थेट महेंद्रसिंह धोनीशीच तुलना केलीय.
कारण घ्या जाणून-
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी त्याच्या कूल स्टाईलसाठी ओळखला जातो. धोनीच्या चेहऱ्यावरचे भाव सामन्याच्या निकालानं बदलत नाहीत. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध सामन्यात हिरो ठरलेल्या जीमी नीशमची एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत जिमी नीशीम एकटाच खुर्चीवर बसलेला दिसत आहे. या विजयानंतर न्यूझीलंडचे सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले. मात्र, जिमी नीशम त्याच खुर्चीवर शांत बसला होता. ज्यामुळं त्याची धोनीशी तुलना केली जात आहे.
इंग्लडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. मार्टिन गप्टील आणि कर्णधार केन विल्यमसन स्वस्तात बाद झाले. त्यानंतर डेवॉन कॉन्वे आणि डेविड मलान यांनी संघ सावरला. कॉन्वे बाद झाल्यानंतर. जेम्स निशामने 27 धावांची फटकेबाजी करत विजय जवळ आणला. तर, डॅरेल मिचेलने नाबाद 72 धावांच्या खेळी करून न्यूझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघानं अंतिम सामन्यात धडक दिलीय.
उपांत्य फेरीचा दुसरा सामना पाकिस्तान- ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. न्यूझीलंडच्या संघाला आतापर्यंत एकही टी-20 विश्वचषक जिंकता आला नाही. या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विरुद्ध संघाला पराभूत करून न्यूझीलंड इतिहास रचण्याचा प्रयत्न करणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)