Rohit Sharma : सर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायचीय फक्त, चाहत्याची रोहित शर्मा अन् श्रेयसला विनंती, दोघांची भन्नाट प्रतिक्रिया, Video
Rohit Sharma : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली आहे. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबई : भारत आणि श्रीलंका (IND vs SL ) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली आहे. या मालिकेत भारताला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्मा वगळता भारतीय क्रिकेट संघाचे इतर फलंदाज दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मानं (Rohit Shrma) भारतीय क्रिकेट संघाला टी 20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून दिलेलं आहे. यामुळं भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-0 नं गमवावी लागली. भारतानं 2013 नंतर 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवलं. भारतानं तब्बल 13 वर्षानंतर आयसीसीच्या ट्राफीचा दुष्काळ संपवला. भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्त्वात जिंकला होता. पुढील वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं वेगवेगळ्या घडामोडी सुरु आहेत.
भारत पाकिस्तामध्ये खेळण्यासाठी तयार होणार की स्पर्धा हायब्रीड मॉडेलद्वारे भरवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दरम्यान भारताचा कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका चाहत्यानं रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद जिंकण्याची विनंती करताना पाहायला मिळतो. यावर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरनं भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक चाहताना रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर सोबत सेल्फी घेताना पाहायला मिळतो. तो चाहता रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे, असं म्हणतो. यावर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर दोघांनी त्या व्यक्तीचं म्हणनं ऐकून घेतलं आणि दोघे थोड्या वेळानतंर हसले.
भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत एकाच गटात
2024 च्या ट्रॉफीचं संयोजकपद पाकिस्तानकडे आहे. भारतीय क्रिकेट संघ 2008 नंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला नाही. भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत एकाच गटात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सुरक्षेसाठी भारताचे सामने लाहोरमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर, भारतानं हायब्रीड पद्धतीनं स्पर्धा आयोजित करन श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्यात यावी , अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळं आगामी काळात भारताच्या चॅम्पियन्स ट्राफीमधील सहभागाबाबत स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघाकडे 11 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाची संधी आहे.
A few days back when captain Rohit and Shreyas Iyer were going to Colombo from Mumbai airport
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 9, 2024
Fan to Iyer - Sir Abhi CT jeetna he bas CT sir 😂
Iyer - Sir CT...😂 and both Rohit and Iyer started laughing.😂 pic.twitter.com/svMbGVau76
संबंधित बातम्या :