एक्स्प्लोर

Shubman Gill Record : शुभमनचं एक शतक आणि मागे टाकलं, सचिन, विराट, युवराजसारख्या दिग्गजांना, पाहा रेकॉर्ड

Shubman Gill : भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने अखेर आपलं पहिलं-वहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतक ठोकलं आहे.

Shubman Gill : भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कारकिर्दीतील पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याने 130 धावा केल्याने एका नव्या रेकॉर्डला गवसणी घातली ती म्हणजे, शुभमनने आज केलेल्या 130 धावांमुळे त्याने झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज हा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे त्याने महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 127 रनांचा रेकॉर्ड मोडला आहे.

शुभमन गिल याने एकूण 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 30 डावानंतर पहिलं-वहिलं शतक झळकावलं आहे. अनेकदा 90 धावांवर बाद झाल्याने त्याच्यावर नर्व्हस 90 (Nervous 90) चा ठपका लागला होता. तो देखील आज धुवून निघाला आहे. शुभमनने भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 97 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकार ठोकत 130 धावा केल्या आहेत. दरम्यान शुभमन आणि सचिनंतर या यादीत युवराज, विराट या दिग्गजांचाही नंबर लागतो.

झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय

शुभमन गिल - 2022 मध्ये 97 चेंडूत 130 धावा

सचिन तेंडुलकर - 1998 मध्ये बुलावायो येथे 130 चेंडूत नाबाद 127 धावा

अंबाती रायुडू -  2015 मध्ये 133 चेंडूत नाबाद 124 धावा

युवराज सिंह - 2005 मध्ये 124 चेंडूत 120 धावा

शिखर धवन - 2013 मध्ये 127 चेंडूत 116 धावा

विराट कोहली - 2013 मध्ये 108 चेंडूत 115 धावा

नर्व्हस 90 चा दुष्काळ संपला

शुभमन त्याच्या क्लासिक शॉट्समुळे खास ओळखलं जातं. शुभमनत्या कारकिर्दीचा विचार करता आधी अंडर 19 विश्वचषक विजयी संघाचा उपकर्णधार आणि मालिकावीर असणाऱ्या शुभमनने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून नाव मिळवलं. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळताना त्याने संघाला चषक जिंकवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.विशेष म्हणजे भारताच्या ऐतिहासिक गाबा येथील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी विजयातही शुभमनत्या 91 धावा अत्यंत महत्त्वपूर्ण होत्या. तेव्हाही 9 धावांनी त्याचं शतक हुकलं होतं. आता काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भारत-वेस्ट इंडीज सामन्यातही शुभमनचं शतक केवळ 2 धावांमुळे राहिलं होतं. पावसाच्या व्यत्ययामुळे तो शतक पूर्ण करु शकला नाही. पण आज मात्र त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे. याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात 98 धावांसह 82 तसंच 61 धावांची खेळीही केली आहे. विशेष म्हणजे त्याने हरारे क्रिकेट स्टेडियममध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 130 धावा करत त्याने अंबाती रायडूचा 124 धावांचा रेकॉर्ड मोडला आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget