एक्स्प्लोर

Shubman Gill Century : नर्व्हस 90 चा दुष्काळ संपला, झिम्बाब्वेविरुद्ध शुभमननं ठोकलं दमदार शतक

IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 290 धावांचं आव्हान दिलं असून यामध्ये सलामीवीर शुभमननं ठोकलेलं शतक महत्त्वपूर्ण ठरलं आहे.

Shubman Gill : भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) अखेर आपलं पहिलं-वहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहे. तब्बल 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 30 डावानंतर त्याने शतकाला गवसणी घातली आहे. अनेकदा 90 धावांवर बाद झाल्याने त्याच्यावर नर्व्हस 90 (Nervous 90) चा ठपका लागला होता. तो देखील आज धुवून निघाला आहे. शुभमनने भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 97 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकार ठोकत 130 धावा केल्या आहेत. 

शुभमन गिल फार कमी सामन्यांत आपल्या क्लासिक खेळीमुळे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे. त्याने आतापर्यंत अधिक धावा केल्या नसल्या तरी त्याच्या दमदार शॉट्समुळे त्याला ओळखलं जातं. आधी अंडर 19 विश्वचषक विजयी संघाचा उपकर्णधार आणि मालिकावीर असणाऱ्या शुभमनने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून नाव मिळवलं. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळताना त्याने संघाला चषक जिंकवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

नर्व्हस 90 चा दुष्काळ संपला

विशेष म्हणजे भारताच्या ऐतिहासिक गाबा येथील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी विजयातही शुभमनत्या 91 धावा अत्यंत महत्त्वपूर्ण होत्या. तेव्हाही 9 धावांनी त्याचं शतक हुकलं होतं. आता काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भारत-वेस्ट इंडीज सामन्यातही शुभमनचं शतक केवळ 2 धावांमुळे राहिलं होतं. पावसाच्या व्यत्ययामुळे तो शतक पूर्ण करु शकला नाही. पण आज मात्र त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे. याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात 98 धावांसह 82 तसंच 61 धावांची खेळीही केली आहे. विशेष म्हणजे त्याने हरारे क्रिकेट स्टेडियममध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 130 धावा करत त्याने अंबाती रायडूचा 124 धावांचा रेकॉर्ड मोडला आहे.

झिम्बाब्वेसमोर 290 धावाचं आव्हान

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या 63 वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल 46 चेंडूत 30 धावा करून माघारी परतला.  ब्रॅडली इवांसनं त्याला बाद केलं. त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं इशान किशनसोबत 140 धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला. ईशान किशन 50 धावा करुन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं 130 धावा केल्या. ज्यामुळे भारतानं 289 धावा करत झिम्बाब्वेला 290 धावाचं आव्हान दिलं आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PAK vs BAN : सामना थांबला अन् सगळे स्तब्ध झाले… पाकिस्तानी खेळाडू स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
सामना थांबला अन् सगळे स्तब्ध झाले… पाकिस्तानी खेळाडू स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Kuldeep Yadav Wedding : मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
Ban vs Pak 2nd ODI : पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Cocktail 2 Poster Out: एक कार,तीन स्टार्स… ‘कॉकटेल 2’ चं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पण 18 मार्चची भानगड काय?
एक कार,तीन स्टार्स… ‘कॉकटेल 2’ चं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पण 18 मार्चची भानगड काय?
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
Embed widget