एक्स्प्लोर

IND vs PAK : तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तानी संघ भारतात येणार; वर्ल्डकपसाठी सरकारने दिली परवानगी

IND vs PAK : पाकिस्तान सरकारने अखेर विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास परवानगी दिली आहे.

IND vs PAK : जगभरातील क्रिकेट (Cricket) चाहत्यांना एकदिवसीय विश्वचषकात (वनडे वर्ल्ड कप) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे, हे आता निश्चित झालं आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी (World Cup 2023) पाकिस्तानी संघ पाठवताना ज्या अडचणी येत होत्या, त्या आता दूर झाल्या आहेत. पाकिस्तान सरकारने अखेर विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तानी संघ पुन्हा भारतात येणार आहे. यापूर्वी 2016 च्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता.

14 ऑक्टोबरला एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी 6 ऑगस्ट रोजी एक निवेदन जारी करून संघ भारतात पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांना खेळ आणि राजकारण यांची सांगड घालायची नाही आणि त्यामुळे 2023 च्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधित बाबींच्या मार्गावर येऊ नयेत.

पंतप्रधानांच्या समितीने पाठिंबा दिला होता

विश्वचषकासाठी संघ पाठवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. यात सरकारचे इतर अनेक मंत्रीही होते. या आठवड्याच्या सुरुवातीला समितीची बैठक झाली, ज्यामध्ये भुट्टो यांच्यासह बहुतांश मंत्र्यांनी संघ भारतात पाठवण्यास पाठिंबा दिला. त्यानंतरच सरकारने टीम पाठवण्याचा निर्णय घेतला.

सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला

पाकिस्तानी समितीने आपल्या शिफारस केलेल्या संघाच्या मजबूत सुरक्षेबाबत आयसीसीला लेखी हमी देण्याबाबतही बोलले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही आपल्या निवेदनात याचा पुनरुच्चार केला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सरकारला आपल्या संघाच्या सुरक्षेची काळजी आहे आणि त्यांनी याबाबत आयसीसी आणि भारतीय अधिकाऱ्यांनाही कळवले आहे. पाकिस्तान सरकारनेही आपल्या संघाच्या भारत दौऱ्यावर पूर्ण सुरक्षेची अपेक्षा व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

IND Vs WI, Match Highlights : भारताची पुन्हा हाराकिरी! दुसऱ्या टी 20 सामन्यात विडिंजचा दोन विकेटने विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट  06 October 2024  ABP MajhaHarshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणारHiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चाABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 11 AM 06 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Embed widget