एक्स्प्लोर

Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?

Sharad Pawar NCP: गेल्या काही काळात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. बबन शिंदे यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी अनेक गणितं साधली आहेत

सोलापूर: माढा विधानसभेसाठी सध्या सर्वात जास्त मागणी शरद पवार यांच्या तुतारीकडे असून यासाठी अनेक दिग्गज उमेदवारीकडे डोळा लावून बसले आहेत. यातच माढ्याचे सहा टर्म आमदार असणारे अजित पवार गटाचे बबन दादा शिंदे (Baban Shinde) यांनी महायुतीला रामराम ठोकत तुतारी घेऊन निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आपल्या मुलाला शरद पवारांनी (Sharad Pawar) जरी तिकीट नाही दिले तर महायुतीकडून न लढता अपक्ष लढणार असल्याची घोषणा केल्याने आता पवारांकडे उमेदवारीसाठी खऱ्या अर्थाने भाऊ गर्दी तयार झाली आहे. यामध्ये रणजीत भैय्या शिंदे भाजपकडून (BJP) पवारांच्या कडे निघालेले अभिजीत पाटील आणि भाजप विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (RanjitSinh Mohite patil) ही तीन नावे सर्वात जास्त चर्चेत आहेत. 

सध्या तरी पवार यांना माढातून अनेक पर्याय दिसत असले तरी आमदार बबनदादा शिंदे यांच्या मुलाला तिकीट दिल्यास त्यांना एकाच वेळी तीन मतदार संघात आपले प्राबल्य वाढवता येणार आहे. आमदार शिंदे हे माढ्याचे आमदार असून त्यांचे लहान भाऊ संजय मामा शिंदे हे करमाळ्यात अपक्ष आमदार आहेत . संजय मामा शिंदे हे जरी अजित पवार यांच्यासोबत असले तरी त्यांनी यावेळीही अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. करमाळ्यातून शरद पवार गटाने माजी आमदार व मोहिते पाटील समर्थक नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली होती. त्यामुळे शिंदेंना माढ्यातून उमेदवारी दिल्यास संजय शिंदे हे देखील निवडून आल्यास शरद पवार यांच्या मागे उभे राहू शकतात. त्यामुळे करमाळ्यात नारायण पाटील आले किंवा संजय शिंदे आले तरी दोन्ही ठिकाणी फायदा शरद पवार यांचाच होणार आहे. 

आमदार शिंदे यांच्या मुलाला तिकीट देण्यामागे खासदार सुप्रिया सुळे यांचाही ओढा असणारा असून त्यांच्या बारामती मतदारसंघातील भोर वेल्हा चे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे हे आमदार शिंदे यांचे जावई आहेत . शिंदे यांची धाकटी कन्या आमदार थोपटे यांना दिली असून त्या बाजूनेही शिंदेंकडे उमेदवारी देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्के देताना सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यावर भर दिला आहे. यामुळेच इंदापुरातून स्थानिक स्वपक्षीय नेत्यांचा विरोध डावलत हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी सोपवली आहे. अशाच पद्धतीने माढ्यातून जरी आमदार शिंदे यांना काही स्थानिक स्वपक्षीय नेत्यांचा विरोध असला तरी अनुभवी शरद पवार हे  रणजीत शिंदे यांचं उमेदवारी देतील. 

बबन शिंदे यांना पक्षात घेऊन शरद पवारांनी काय साधलं?

शिंदे हे गेले सहा टर्म माढ्याचे आमदार असल्याने प्रत्येक मतदाराशी संपर्क असणारे ते एकमेव नेते आहेत . कायम दुष्काळी असणाऱ्या माढा तालुक्याला विविध पद्धतीने पाणी आणून आमदार शिंदे यांनी माढ्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. आज सर्वात जास्त गाळप करणारा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा आमदार शिंदेंचाच असून तो ही माढ्यातच आहे. अशा वेळेला गेल्या सहा टर्म पासून ज्या शिंदे घराण्याने माढ्यावर विजयाचा झेंडा फडकवला त्याच घरात उमेदवारी दिल्यास माढा तर जिंकता येईलच शिवाय करमाळा आणि भोर वेल्हा यांचेही गणित साधता येईल हा पवारांचा हिशोब असणार आहे. आमदार शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील एक मोठे राजकीय नाव असून त्यांचा प्रभाव मोहोळ पंढरपूर मंगळवेढा अशा मतदारसंघातही चांगला पडून त्याचा फायदा तुतारीला होऊ शकणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात असलेला जनतेचा रोष आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे नाराज झालेला मराठा समाज याचा फटका आमदार शिंदे यांच्या माढा विधानसभा मतदारसंघातही दिसून आला होता. माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीला जवळपास 54 हजाराची आघाडी मिळाली होती. अर्थात लोकसभेचा वातावरण विधानसभेला आहे असे चित्र नसले तरी आमदार शिंदे हे आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत असल्याने ते कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. आमदार शिंदे यांच्या विरोधकांची संख्या किती जरी असली तरी त्यांच्यात कधीही एकी दिसून येत नाही. त्यामुळेच आजवर आमदार शिंदे यांच्या विरोधात 60 ते 70 हजार एवढीच मते विरोधी उमेदवाराला मिळत गेलेली आहेत. रणजीत शिंदे यांना उमेदवारी दिली तर हमखास विजय मिळू शकतो याचे गणित शरद पवार यांना माहित आहे. त्यामुळेच माढ्यात कितीही इच्छुकांनी उमेदवारीवर दावा सांगितला असला तरी पवार हे शिंदे यांच्या घरातच उमेदवारी देतील याची जाणीव त्यांच्या विरोधकांना देखील आहे. 

शरद पवार एका दगडात अनेक पक्षी मारणार?

पाच दशके राजकारणाचा दीर्घ अनुभव असणारे शरद पवार हे त्यामुळेच माढ्यात रणजीत शिंदे यांना उमेदवारी देतील असे जाणकारांचे मत आहे. शिंदे यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज होण्याची शक्यता असली तरी शिंदे आणि मोहिते पाटील यांच्या लढ्यात विधानसभेला शिंदे भारी पडतील असे चित्र आहे. शिंदेंना विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ही माढ्याची उमेदवारी पंढरपूर किंवा अकलूजकडे देण्यास विरोध केल्याने पुन्हा स्थानिक उमेदवाराचा विषय ही निवडणुकीत पुढे येऊ शकणार आहे. मोहिते पाटील यांच्या घरात माढ्याची खासदारकी दिल्यानंतर लगेच पुन्हा त्याच घरात शरद पवार हे आमदारकी देतील अशी शक्यता खूपच कमी आहे. यावेळी भाजपने लोकसभेचे उमेदवारी डावल्याने मोहिते पाटील शरद पवारांकडे आले होते त्यामुळे लगेच मोहिते पाटील यांचे वर पवार एवढा विश्वास टाकतील असे दिसत नाही. 

याच मतदारसंघातून पवारांकडे अभिजीत पाटील हेही इच्छुक असले तरी पाटील हे तरुण असून त्यांची समजूत पवार घालू शकतील असा विश्वास जाणकारांना आहे. त्यामुळे माढ्याच्या गणितात इच्छुक कितीही असले तरी विजयाचा गुलाल शिंदे घरात उमेदवारी दिल्यावर मिळू शकेल याचा अंदाज शरद पवार यांना नक्कीच आहे. त्यामुळे माढ्याची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात तुतारीकडेच येणार असून येथील उमेदवाराही शिंदे यांच्याच घरातील असेल. त्यामुळेच सत्तेत असणारे आणि अजितदादांच्या निकटवर्तीय मानले जाणारे अनुभवी आमदार शिंदे यांनी एका फटक्यात अजित दादा व महायुतीचा विषय संपवला नसता. शिंदे यांना उमेदवारी देऊन पुन्हा एकदा शरद पवार एका दगडात अनेक पक्षी मारतील.

आणखी वाचा

लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीतील घटना नशेखोरांचं काम, दुपारपर्यंत आरोपी अटकेत असतील, सुजय विखे पाटलांचा उशीरा आलेल्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा
शिर्डीतील घटना नशेखोरांचं काम, दुपारपर्यंत आरोपी अटकेत असतील, सुजय विखे पाटलांचा उशीरा आलेल्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा
Mumbai Crime : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवरील रेल्वेमध्ये महिलेवर अत्याचार, सीसीटीव्हीतून आरोपीचा छडा लागला, आरपीएफकडून आरोपीला बेड्या   
मुंबईत वांद्रे टर्मिनसवर रेल्वेमध्ये महिलेवर अत्याचार, मध्यरात्री धक्कादायक घटना, आरोपीला काही तासात अटक
Donald Trump Tariff Countries : डोनाल्ड ट्रम्प यांची एकाचवेळी भारत आणि चीनला जाहीर धमकी, पण पहिल्या मुसक्या चीनच्याच आवळल्या; भारताचे नाव नाही, किती खोलवर परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची एकाचवेळी भारत आणि चीनला जाहीर धमकी, पण पहिल्या मुसक्या चीनच्याच आवळल्या; भारताचे नाव नाही, किती खोलवर परिणाम होणार?
Crime news: दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश
दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 03 February 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणालीABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सRamdas Tadas on ShivRaj Rakshe| शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड सस्पेंड, रामदास तडस अॅक्शन मोडवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीतील घटना नशेखोरांचं काम, दुपारपर्यंत आरोपी अटकेत असतील, सुजय विखे पाटलांचा उशीरा आलेल्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा
शिर्डीतील घटना नशेखोरांचं काम, दुपारपर्यंत आरोपी अटकेत असतील, सुजय विखे पाटलांचा उशीरा आलेल्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा
Mumbai Crime : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवरील रेल्वेमध्ये महिलेवर अत्याचार, सीसीटीव्हीतून आरोपीचा छडा लागला, आरपीएफकडून आरोपीला बेड्या   
मुंबईत वांद्रे टर्मिनसवर रेल्वेमध्ये महिलेवर अत्याचार, मध्यरात्री धक्कादायक घटना, आरोपीला काही तासात अटक
Donald Trump Tariff Countries : डोनाल्ड ट्रम्प यांची एकाचवेळी भारत आणि चीनला जाहीर धमकी, पण पहिल्या मुसक्या चीनच्याच आवळल्या; भारताचे नाव नाही, किती खोलवर परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची एकाचवेळी भारत आणि चीनला जाहीर धमकी, पण पहिल्या मुसक्या चीनच्याच आवळल्या; भारताचे नाव नाही, किती खोलवर परिणाम होणार?
Crime news: दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश
दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश
Right to Die with dignity : कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका कायदा आहे तरी काय?
कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका कायदा आहे तरी काय?
Rupee at 87 : अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा परिणाम रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, शेअर बाजारात घसरण
रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, आशियातील चलनांमध्ये घसरण
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा; राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप
महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा; राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप
ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली
ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली
Embed widget