एक्स्प्लोर

मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?

Sharad Pawar: क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

पुणे: विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर चांगलेच चर्चेत आले होते. काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे आमदार खोसकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत, या मतदारसंघामध्ये इच्छुकांची देखील गर्दी जमली आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला आले असल्याची माहिती आहे. 

तर त्यांच्यावरील क्रॉस व्होटिंगचा आरोप चुकीचा असल्याचा शरद पवारांना सांगणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. माझ्यावरील आरोप सर्व चुकीचे आहेत, काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघातील कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार असल्याची माहिती आहे. 

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नावावर काँग्रेस पक्षाने उमेदवारीसाठी नकार घंटा दर्शवली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार खोसकर अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या ते महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत चर्चा करत आहे.

याआधी हिरामण खोसकरांनी शरद पवारांची घेतली भेट

अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय आणि सध्या काँग्रेसचे आमदार असलेले हिरामण खोसकर यांनी याआधी देखील शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून हिरामण खोसकर यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात संधी देण्याची मागणी केल्याची माहिती आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह हिरामण खोसकर यांनी आधी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. आज पुन्हा एकदा ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. 

कोण आहेत हिरामण खोसकर?

नाशिक जिल्ह्यात एकूण 15 आमदार आहेत. यात काँग्रेसचा एकमेव आमदार आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. हिरामण खोसकर काँग्रेसचे असले तरी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांशी (Chhagan Bhujbal) त्यांचा चांगला संबंध आले. हिरामण खोसकर हे आदिवासी बहुल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Embed widget