Mohammed Siraj : लॉर्ड्स कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद सिराजला ‘ती’ चूक नडली! ICC ने सुनावली कठोर शिक्षा, नेमकं काय घडलं?
ICC Fine Mohammed Siraj : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सध्या लॉर्ड्स मैदानावर रंगतदार वळणावर आहे. चौथ्या दिवशी दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली.

England vs India 3rd Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सध्या लॉर्ड्स मैदानावर रंगतदार वळणावर आहे. चौथ्या दिवशी दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 192 धावांत आटोपला, त्यामुळे भारताला विजयासाठी 193 धावांचे लक्ष मिळाले. प्रत्युत्तरादाखल, जेव्हा टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरली, तेव्हा इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि 58 धावांच्या आत 4 भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता टीम इंडियाला विजयासाठी 135 धावांची आवश्यकता आहे. त्याच वेळी, इंग्लंडला जिंकण्यासाठी भारताचे 6 विकेट घ्यायचे आहेत.
मोहम्मद सिराजला ‘ती’ चूक नडली! ICC ने सुनावली कठोर शिक्षा
चौथ्या दिवशी लॉर्ड्सवर केवळ एक रोमांचक खेळ झाला नाही, तर खेळाडूंमध्ये जोरदार वादही झाला. खरं तर, चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाही मैदानावर तिसऱ्या दिवसाचा उत्साह कायम होता. इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान, मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट यांच्यात जोरदार वाद झाला.
बेन डकेट (12) ला बाद केल्यानंतर या विकेटचा आनंद साजरा करताना सिराजने त्याला खांदा मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या घटनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सिराजच्या या कृत्यावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सहाव्या षटकात सलामीवीर बेन डकेटला बाद केल्यानंतर सिराज जवळ आला आणि आक्रमकपणे आनंद साजरा केला. या कृत्याबद्दल सिराजला आता शिक्षा झाली आहे.
🚨Mohammed Siraj fined 15% match fee, handed one demerit point for Ben Duckett send-off on Day 4 at Lord's. #ENGvIND pic.twitter.com/cYiFFf9Kuh
— Cricbuzz (@cricbuzz) July 14, 2025
सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला... आयसीसीने मोहम्मद सिराजला सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल सिराजवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल सिराज दोषी आढळला आहे.
याशिवाय, सिराजच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे, जो 24 महिन्यांच्या कालावधीत त्याचा दुसरा गुन्हा होता, ज्यामुळे 24 महिन्यांच्या कालावधीत त्याचे डिमेरिट पॉइंट दोन झाले आहेत. 7 डिसेंबर 2024 रोजी अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सिराजला शेवटचा डिमेरिट पॉइंट मिळाला होता.
हे ही वाचा -





















