एक्स्प्लोर

Ind vs Eng 3rd Test 4th Day VIDEO: चल जा रे, बॉल टाक...; आकाशदीप कार्सला भिडला, पुढच्याच षटकात नको ते घडलं, इंग्लंडचा राडा

Ind vs Eng 3rd Test 4th Day: भारताला विजयासाठी अद्याप 135 धावांची गरज आहे. आज तिसऱ्या कसोटीतील पाचवा दिवस असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Ind vs Eng 3rd Test 4th Day: तिसऱ्या कसोटीत सावध पवित्र घेतलेल्या यजमान इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांत गुंडाळत भारताने (India vs England 3rd Test) सामन्यावर पकड मिळवली. मात्र, यानंतर आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने भारताची चौथ्य दिवसअखेर 17.4 षटकांत 4 बाद 58 धावा अशी अवस्था झाली. भारताला विजयासाठी अद्याप 135 धावांची गरज आहे. आज तिसऱ्या कसोटीतील पाचवा दिवस असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

लॉर्ड्स कसोटी जसजशी पुढे सरकत आहे तसतसे भारत आणि इंग्लंडमधील वातावरणही तापत आहे. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी जेव्हा इंग्लंडचे सलामीवीर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आले तेव्हा खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर, चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रातही असेच काहीसे दिसून आले. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात, जेव्हा नाईट वॉचमन म्हणून आकाश दीप फलंदाजीसाठी आला, त्यावेळी चौथा दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक होती. यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी आकाश दीपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सने आकाश दीपसोबत स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. पण, आकाश दीपने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 

नेमकं काय घडलं?, VIDEO:

भारताच्या दुसऱ्या डावातील 17 व्या षटकात, आकाश दीपला चेंडू टाकल्यानंतर, ब्रायडेन कार्स आला आणि रागाने काहीतरी म्हणाला. आकाश दीपनेही हाताने इशारा करत चल जा रे, बॉल टाक...असं म्हटलं. यानंतर, क्षेत्ररक्षण करणारा बेन स्टोक्स टाळ्या वाजवत केएल राहुलकडे आला आणि काहीतरी म्हणाला. दोघांमध्ये काही संवाद झाला. त्यानंतर चौथा दिवसातील शेवटचं षटक टाकण्यासाठी बेन स्टोक्स आला आणि त्याने चौथ्याच चेंडूवर आकाश दीपला बाद केले. त्यानंतर चौथा दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

यशस्वी जैस्वाल शून्यावर, तर शुभमन गिल सहा धावांवर बाद-

लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी फलंदाजी करणं फारच कठीण वाटत होतं. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला, तर करुण नायरने थोडा वेळ लढा देण्याचा प्रयत्न केला, पण 14 धावा करत पॅव्हिलियनमध्ये परतला. सलग दोन सामन्यांमध्ये शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल यावेळी फक्त 6 धावाच करू शकला. तर आकाश दीप 1 धाव करत बाद झाला.

संबंधित बातमी:

Eng vs Ind 3rd Test Day 4 Stumps : लॉर्ड्स कसोटीमध्ये रंजक ट्विस्ट, इंग्लंडचा जबरदस्त पलटवार! इतिहास रचण्यासाठी भारताला 135 धावांची गरज, राहुल-पंत-जडेजावर देशाच्या नजरा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
FIFA World Cup 2026 : टीम इंडियाचं स्वप्न अधुरंच... पण भारतीय वंशाचे 4 शिलेदार यंदा FIFA World Cup गाजवणार; कोण कोणत्या देशाकडून खेळणार?
टीम इंडियाचं स्वप्न अधुरंच... पण भारतीय वंशाचे 4 शिलेदार यंदा FIFA World Cup गाजवणार; कोण कोणत्या देशाकडून खेळणार?
Mohammed Siraj: नवा कर्णधार, नवी टीम अन् आता नवा ट्विस्ट; BCCI च्या निर्णयाने चाहतेही चक्रावले, ऐनवेळी मोहम्मद सिराजला संघातून बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?
नवा कर्णधार, नवी टीम अन् आता नवा ट्विस्ट; BCCI च्या निर्णयाने चाहतेही चक्रावले, ऐनवेळी मोहम्मद सिराजला संघातून बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?
Ruturaj Gaikwad Century : ऋतुराजला तोड नाही भाऊ... निवड समितीने डावललं, ऐनवेळी एन्ट्री मारली अन् पहिल्याच सामन्यात शतक! सर्वांना केलं गप्प
ऋतुराजला तोड नाही भाऊ... निवड समितीने डावललं, ऐनवेळी एन्ट्री मारली अन् पहिल्याच सामन्यात शतक! सर्वांना केलं गप्प

व्हिडीओ

Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Embed widget