KL Rahul Out VIDEO : चेंडू पायामधून घुसला अन् KL राहुल तेथेच फसला! विचित्र पद्धतीने पडली विकेट, पाहा हा व्हिडिओ
Australia A vs India A 2nd unofficial Test : ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुल पुन्हा अभिमन्यू ईश्वरनसोबत डावाची सलामी देण्यासाठी आला. पण....
KL Rahul Out VIDEO : केएल राहुलला पुन्हा एकदा फेल ठरला आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियात असून बॉर्डर गावसकर मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध खेळत आहे. धावा करून फॉर्ममध्ये परतण्याची ही त्याची शेवटची संधी होती, पण इथेही त्याने माती खाल्ली. दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या डावात तो ज्या पद्धतीने आऊट झाला, तो अतिशय विचित्र होता.
"Don't know what he was thinking!"
— cricket.com.au (@cricketcomau) November 8, 2024
Oops... that's an astonishing leave by KL Rahul 😱 #AUSAvINDA pic.twitter.com/e4uDPH1dzz
आज ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुल पुन्हा अभिमन्यू ईश्वरनसोबत डावाची सलामी देण्यासाठी आला. पण त्याला केवळ 10 धावा करता आल्या आणि त्यासाठी त्याने 44 चेंडूंचा सामना केला. या डावात त्याच्याकडे एक षटकार तर सोडा, एकही चौकार नव्हता. राहुल ज्याप्रकारे क्लीन बोल्ड झाला आहे ते अनेकदा पाहायला मिळत नाही. चेंडू त्याच्या पायांमधून गेला आणि स्टंपला लागला आणि तो खेळपट्टीवर पाहत राहिला.
राहुल पहिल्यांदाच अपयशी ठरला असे नाही. याच सामन्यातील पहिल्या डावात तो केवळ 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या चार धावा एका चौकाराच्या जोरावर आल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी केएल राहुलचीही संघात निवड करण्यात आली आहे. बाकी टीम इंडिया नंतर येईल, पण राहुलला आधीच तयारीसाठी पाठवले होते, पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही.
There's no way even KL Rahul fans can defend him 🤡pic.twitter.com/WtGlWQjYtq
— Dinda Academy (@academy_dinda) November 8, 2024
बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतही राहुल काही विशेष करू शकला नाही, त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याचा अनुभव लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी त्याचा संघात समावेश केला. पण आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल तेव्हा राहुलला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की त्याला बाहेर बसावे लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एकंदरीत, राहुलसाठी येणारा काळ खूप कठीण जाणार हे निश्चित आहे.
हे ही वाचा -