1983 World Cup: कपिल देव यांची नाबाद 175 धावांची खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड नाही, कारण काय?
1983 World Cup: माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
1983 World Cup: माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडीजच्या संघावर मात करून भारतानं इतिहास रचला आहे. या विश्वषकात कपिल देव यांनी झिम्बाब्वे दरम्यान नाबाद 175 धावांची खेळी केली होती. नुकताच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहचा चित्रपट 83 यामध्ये दाखवण्यता आले होते. पंरतु, विश्वचषकातील कपिल देव यांची नाबाद 175 धावांची उत्कृष्ट खेळी कॅमेऱ्यात कैद झाली नाही. यामागचं कारण आता समोर आलय.
1983 च्या विश्वचषकात भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात 18 जून रोजी टुनब्रिज वेल्स मैदानावर सामना खेळण्यात आला होता. हा सामना भारतानं 31 धावांनी जिंकला होता. भारताच्या या विजयात कर्णधार कपिल देव यांचं मोलाचं योगदान होतं. या सामन्यात त्यांनी नाबाद 175 धावांची खेळी करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.परंतु दुर्दैवानं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कपिल यांची खेळी कॅमेऱ्यात कधीच रेकॉर्ड झाली नाही. कारण त्यावेळी देशातील एकमेव प्रसारक बीसीसीनं देशव्यापी संप पुकारला होता. ज्यामुळं कपिल देव यांची ही खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली नव्हती.
कपिल देव म्हणतात...
टेलिकॉम ऑपरेटरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देव म्हणाले की, "मला लोकांवर टीका करायला आवडत नाही. लोक म्हणतात की, ते रेकॉर्ड झाले नाही याबद्दल तुम्हाला काही हरकत नाही? यावर मी नेहमी नाही म्हणतो. कारण ती खेळी आजही माझ्या मनात रेकॉर्ड आहे".
कपिल देव यांची क्रिकेट कारकिर्द
कपिल देव यांनी भारताकडून 1970 भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. त्यांनी 1994 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला. यादरम्यान त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना 225 एकदिवसीय सामन्यात 253 विकेट्स आणि3 हजार 783 धावा केल्या आहेत. तर, कसोटीमध्ये त्यांनी 131 सामन्यात 434 विकेट्स आणि 5 हजार 248 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : कधी काळी खेळण्यावर बंदी; आता CSKचा 'सर' बनला रॉकस्टार जाडेजा
- यंदा कोण जिंकणार आयपीएल, कोणता संघ राहणार तळाशी? सुनील गावस्करांनी सांगितली मन की बात
- Mumbai Indians Team Preview : यंदाही दम दाखवणार का?, सर्वात यशस्वी आयपीएल संघ मुंबई यंदा कशी खेळणार? काय असेल रणनीती?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA