Jasprit Bumrah Coldplay: Coldplay च्या कार्यक्रमात बुमराहची उपस्थिती; क्रिस मार्टीनने गायलं खास गाणं, स्क्रीनवर 3 विकेट्सही दाखवल्या, VIDEO
Jasprit Bumrah Coldplay: क्रिस मार्टीनने जसप्रीत बुमराहसाठी खास गाणं देखील गायलं.
Jasprit Bumrah Coldplay नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदाबादमध्ये ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेने (Coldplay) त्यांच्या भारत दौऱ्यातील शेवटचा कार्यक्रम सादर केला. कोल्डप्लेचा शेवटचा संगीत कार्यक्रम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात चाहते उपस्थित होते. दरम्यान, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानात 26 जानेवारीला झालेल्या कोल्डप्लेच्या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah Coldplay Programe) याने देखील उपस्थिती लावली. रॉक बँडच्या मुख्य गायक क्रिस मार्टिन जसप्रीत बुमराहचा चाहता आहे. यावेळी क्रिस मार्टीनने जसप्रीत बुमराहसाठी खास गाणं देखील गायलं. सध्या या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कोल्डप्लेचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहसाठी क्रिस मार्टीनने गाणं गायलं. माझा प्रिय भाऊ जसप्रीत बुमराह, जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज...पण तु इंग्लंडवरुद्ध विकेट्स घेतो, तेव्हा मला खूप वाईट वाटतं...असं क्रिस मार्टिन म्हणाला. यावेळी जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध घेतलेल्या विकेट्स देखील स्क्रीनवर दाखवल्या. यावेळी मैदानात उपस्थित असणाऱ्या चाहत्यांनी देखील या क्षणाचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला.
The GOAT Jasprit Bumrah in the @coldplay concert at Motera Ahemdabad 🐐
— Jehan Dhabhar (@Dhabhar24Jehan) January 26, 2025
The crowd going totally berserk seeing the GOAT 💙💙.. Absolute crazy scenes 🤩🇮🇳 #ColdplayAhmedabad#bumrah #ColdplayOnHotstar #coldplay #indiancricket pic.twitter.com/0zMRduW8Bq
जसप्रीत बुमराह सध्या जगातील नंबर वन वेगवान गोलंदाज आहे. सर्वात मोठा फलंदाजही जसप्रीत बुमराहविरुद्ध खेळण्यास घाबरतो. म्हणूनच क्रिस मार्टिीन देखील जसप्रीत बुमराहचा मोठा चाहता आहे. इंग्लंड हा देखील जगातील एक मोठा क्रिकेट संघ आहे. मात्र जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धही कहर करतो. म्हणूनच चाहता असूनही, बुमराह जेव्हा इंग्लंडविरुद्ध विकेट्स घेतो तेव्हा मार्टिनला वाईट वाटतं.
JASPRIT BUMRAH JERSEY AT COLDPLAY CONCERT IN AHMEDABAD. 🐐🇮🇳 pic.twitter.com/UBYnYpj868
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 26, 2025
कोल्डप्लेचे तीन शो मुंबईत पार पडले-
कोल्डप्लेने सप्टेंबरमध्ये 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर कार्यक्रम सादर करण्याची घोषणा केली होती. पण लोकांची मागणी पाहून कोल्डप्लेने 21 जानेवारीला त्याच ठिकाणी तिसरा शो करण्याची घोषणाही केली होती. तसेच मुंबईनंतर गुजरातमधील अहमदाबादमध्ये 25 आणि 26 जानेवारीला दोन दिवस दोन शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सुमारे 2 लाख लोकांनी हजेरी लावली होती.