एक्स्प्लोर
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते शुक्रवारी सैन्य आणि अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या शौर्या व वीरता याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
smriti singh of martyr anshuman singh's wife
1/8

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते शुक्रवारी सैन्य आणि अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या शौर्या व वीरता याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. सैन्य दलाच्या आणि अर्धसैनिक दलाच्या 10 जवानांचा कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
2/8

त्यामध्ये, 7 जणांना मरणोत्तर हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. या सोहळ्यातील एक भावूक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
3/8

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना कीर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. हे कीर्तीचक्र स्वीकारण्यासाठी अंशुमन यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि त्यांची आई मंजू सिंह आल्या होत्या. यावेळी, स्मृती सिंह यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यातील अश्रू काळीज चिरणारे होते.
4/8

आपल्या पतीची ही शौर्यगाथा ऐकताना स्मृती सिंह यांच्या डोळ्यात अश्रू तरळल होते. पांढरी साडी परिधान केलेल्या स्मृती यांनी भरलेल्या डोळ्यांनी पतीच्या सन्मानार्थ कीर्तीचक्र स्वीकारले. त्यानंतर, त्यांनी पतीच्या आठवणीत जीवनप्रवास उलगडा
5/8

''आम्ही सर्वात पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटलो, तेव्हाच मनातील प्रेम बोलून दाखवलं होतं. त्यानंतर, 1 महिन्याने ते एएफएमसीमध्ये सिलेक्ट झाले, आम्ही तब्बल 8 वर्षे रिलेशनशीपमध्ये होतो.
6/8

आम्ही लग्न केले. दुर्दैवाने लग्नाच्या दोनच महिन्यानंतर त्यांची सियाचीनला पोस्टींग झाली. 18 जुलै 2023 रोजी आम्हा दोघांचं फोनवर सविस्तर बोलणं झालं. पुढील 50 वर्षे आपलं जीवन कसं असेल, मोठं घर असेल, मुलं असतील.... पण, 19 जुलै 2023 रोजी सकाळी फोन आला, ही इज नो मोर...
7/8

पुढील 7 ते 8 तास या बातमीवर माझा विश्वासच बसत नव्हता. माझं मन हे मान्य करायला तयारच नव्हते. मला ते आमच्यातून गेले आहेत, हे खरंच वाटत नव्हतं. पण, कीर्ती चक्र माझ्या हाती आल्यानंतर ते सत्य आहे, याची जाणीव मला झाली, अशी काळीज पिळवटून टाकणारी सत्यस्थिती कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती यांनी सांगितली.
8/8

दरम्यान, स्मृती सिंह यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, त्यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना भविष्यात रंगवलेल्या स्वप्नांचीही माहिती दिली आहे
Published at : 06 Jul 2024 08:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























