![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke Protest : शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मविआच्या शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.
![Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये Nilesh Lanke protest third day over milk and onion rates Supriya Sule Jayant Patil Balasaheb Thorat will visit the protest site Ahmednagar Maharashtra Marathi News Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/b5db729d32cd28d027d7ef0664897f2c1720321751934923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : शेतकऱ्यांच्या कांद्याला (Onion) आणि दुधाला (Milk) योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मविआच्या "शेतकरी जन आक्रोश" आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.
शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी आंदोलनस्थळी यावं, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांची आहे. मात्र निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आंदोलन स्थळी भेट दिली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचव्यावात
जिल्हाधिकाऱ्यांनीच आंदोलकांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचव्यावात अशी भूमिका निलेश लंके यांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे उद्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे देखील भेट देणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंदोलनस्थळी दुधाच्या कॅनची हंडी उभारली
दरम्यान, जनआक्रोश आंदोलनाच्या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आली आहे. त्याला कांद्याच्या माळा लावण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलन स्थळी जनावरांची गाडी आणण्यास पोलिसांनी (Police) मज्जाव केल्याचे दिसून आले. त्यानंतर निलेश लंके यांनी थेट पोलिसांजवळ जाऊन जनावरांची गाडी आंदोलन स्थळी आणली. निलेश लंके आंदोलन करत असताना त्यांच्या पत्नी राणी लंके (Rani Lanke) या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राणे लंके यांनी आंदोलनस्थळी स्वंयपाक करत आणि चूल पेटवत सरकारचा निषेध केला आहे. शिवाय सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहणार, असा इशाराही राणे लंके यांनी दिलाय. आता निलेश लंकेच्या आंदोलनाची दखल प्रशासन कधी घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)