(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2024:रिषभ पहिली चॉईस, संजूची संधी हुकणार?, केएल. राहुलबाबत साशंकता, टीम इंडियामध्ये कुणाला संधी?
Indian Cricket Team For T20 World Cup : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, चीफ सिल्केटर अजित आगरकर आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यामध्ये रविवारी बैठक झाली.
नवी दिल्ली : टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup ) टीम इंडियाची (Team India) घोषणा कधी होणार या संदर्भातील सस्पेन्स कायम आहे. आज भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते अशी माहिती आहे. रविवारी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कोच राहुल द्रविड यांच्यात बैठक झाली. रविवारी तिघांमध्ये जवळपास दोन तास बैठख झाल्याची माहिती आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी आयसीसीच्या नियमानुसार 1 मे पर्यंत टीमची घोषणा करायची आहे. त्यामुळं येत्य काही तासांमध्ये टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.
संजू सॅमसन कमनशिबी ठरणार?
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार आज टीम इंडियाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टसनुसार यावेळी संजू सॅमसन आणि केएल राहुल यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अजित आगरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांची पहिली पसंत रिषभ पंत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं रिषभ पंतला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
कुणाला संधी मिळणार?
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार युजवेंद्र चहलला देखील टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार नाही. त्यानं यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र, त्याची संधी हुकू शकते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या ऑलराऊंडर शिवम दुबेला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शुभमन गिल, रियान पराग, अक्षर पटेल यांना संधी मिळू शकते. राखीव खेळाडू म्हणून खलील अहमदला देखील संधी मिळू शकते.
दरम्यान, आयसीसी टी-20 वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर पहिला वर्ल्ड कप टीम इंडियानं 2007 मध्ये जिंकला होता. टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीच्या लढतीत शेवटच्या बॉलवर भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं होतं. टीम इंडियाला 2007 नंतर आतापर्यंत पुन्हा टी-20 वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.
संभाव्य टीम :
रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे, रिंकू सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज/आवेश खान
इतर दावेदार- केएल राहुल, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, संदीप शर्मा
संबंधित बातम्या :
Happy Birthday Hitman Rohit Sharma : रोहित शर्मा टीम इंडियाचा हिटमॅन ते सिक्सर किंग, रोहितचे पाच विक्रम जे मोडणं अवघड
T20 World Cup 2024 : विराट कोहली संघात हवाच, रोहित शर्मानं BCCI ला दिला सल्ला