(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG, England Playing 11: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, अॅन्डरसन सहित चार खेळाडू बाहेर
India Vs England 2nd Test: इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडच्या संघात मोठा बदल पहायला मिळाला असून अॅन्डरसन सहित तीन खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे तर जोफ्रा आर्चर जखमी आहे असल्याने खेळू शकणार नाही.
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड या दोन संघादरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याला 13 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरुवात होणार आहे. त्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये मोठा बदल पहायला मिळत आहे. डॉम बॅस, जेम्स अॅन्डरसन, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर या चार खेळाडूंना संघातून बाहेर ठेवण्यात आलं असून हे चार खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीत.
इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाच नव्या खेळाडूंचा समावेश केला आहे. मोईन अली, बेन फोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड हे खेळाडू दुसरा कसोटी सामना खेळणार आहेत. क्रिस व्होक्स आणि ओली स्टोन या दोन खेळाडूंमधील एक खेळाडू अंतिम अकरा जणांत खेळणार आहे.
या आधी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 227 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
IND vs ENG : T20 सीरिजसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा; 'हा' धडाकेबाज खेळाडू संघाबाहेर
डॉम बॅस, जेम्स अॅन्डरसन आणि जोस बटलर या तीन खेळाडूंना संघाने विश्रांती देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. तर जोफ्रा आर्चर हा जखमी असल्याने संघाच्या बाहेर आहे. जोस बटलर या पुढचे तीनही सामने खेळू शकणार नाही कारण तो इंग्लंडला परत गेला आहे. बेन फोक्स आता इंग्लंडच्या संघामध्ये विकेट कीपिंगचे काम करणार आहे.
असा असेल इंग्लंडचा संघ रोरी बर्न्स, सिब्ले, लॉरेन्स, जो रुट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेट कीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, क्रिस वोक्स/ओली स्टोन
India vs England | टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जाडेजा मालिकेतून बाहेर