IND vs ENG : T20 सीरिजसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा; 'हा' धडाकेबाज खेळाडू संघाबाहेर
IND vs ENG : इंग्लंडने टीम इंडियाविरुद्धच्या टी20 सीरिजसाठी संघाची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, इंग्लंडच्या टी20 संघात धडाकेबाज फलंदाज जो रुटचा समावेश करण्यात आलेला नाही.
IND vs ENG : टीम इंडियाच्या विरोधात टी-20 सीरिजसाठी इंग्लंडने आपल्या टीमची घोषणा केली आहे. ज्या प्लेयर्सचं सिलेक्शन झालं आहे, त्यामध्ये स्टार फलंदाज जो रुटच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच 16 खेळाडूंच्या यादीत जोफ्रा आर्चर आणि डेव्हिड मलान यांसारख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे.
दरम्यान, यंदा इंग्लंड आणि भारत यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाविरुद्धच्या टी20 सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ :
इंग्लंडच्या संघात इयॉन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस ऑप्ले आणि मार्क वुड यांचा समावेश आहे.
टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कोसोटी सामन्यात इंग्लंडची सरशी
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जो रूटच्या 218 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा संघ 337 धावांवर आटोपला. भारताकडून पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून डॉम बाईस चार विकेट्स घेतल्या. दुसर्या डावात इंग्लंडचा डाव 178 धावांवर आटोपला. पहिल्या डावात इंग्लंडला 241 धावांची आघाडी होती. त्यामुळे भारताला विजयासाठी 420 धावांचे मोठे आव्हान मिळाले. शेवटच्या दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वी भारताचा संघ 192 धावांवर बाद झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- IND vs ENG | इंग्लंडची मालिकेत सरशी; लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली म्हणतो...
- IND vs ENG | विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा कसोटीत सलग चौथा पराभव, पाहा धक्कादायक आकडे
- ICC Test Championship: चेन्नईतील पराभवाने अख्ख समीकरण बदललं; भारताला टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची असेल तर...