एक्स्प्लोर
Advertisement
IND vs SA, 3rd T20I, Toss Update : नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11
IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तिसरा टी20 सामना खेळवला जात असून भारताने अंतिम 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
IND vs SA, 3rd T20 Toss Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना पार पडत असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. पावसामुळे 1 वाजता होणारी नाणेफेक उशिरा झाली आहे. दरम्यान भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भारताने संघात कोणताही बदल केला असून दक्षिण आफ्रिका काही बदलांसह मैदानात उतरत आहे.
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have elected to bowl against South Africa in the third & final #INDvSA ODI of the series.
— BCCI (@BCCI) October 11, 2022
Follow the match 👉 https://t.co/XyFdjVrL7K @mastercardindia pic.twitter.com/LVAgNsKEG8
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 9 धावांनी गमावला होता. ज्यामुळे मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-1 ची बरोबरी घेतली आहे. ज्यानंतर आज होणारा तिसरा सामना जो संघ जिंकेल तो मालिकाही 2-1 ने खिशात घालणार आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताने दुसऱ्या सामन्यात दमदार खेळ दाखवत 7 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे भारताने आज आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. बऱ्याच काळानंतर संघात परतलेला वॉशिंग्टन सुंदर आज काय कमाल करतो का याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघात काही बदल करण्यात आले आहेत. बावुमा अजूनही ठिक नसल्याने डेविड मिलर आज कर्णधार आहे. तर केशव महाराजही आज संघाबाहेर केला असून शम्सीही संघात नसणार आहे. मार्को यॅन्सन मैदानात दिसणार आहे.
भारतीय संघ -
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका संघ - जनेमान मलान, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरीक क्लासेन, डेविड मिलर (कर्णधार), एनरिक नॉर्टेजे, लुंगी इंगिडी,मार्को यॅन्सन, आंदिले फेहलुकवायो आणि ब्योर्न फॉर्च्युइन
हे देखील वाचा -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement