एक्स्प्लोर

IND vs ENG : भारताचं मालिकाविजयाचं स्वप्न भंगलं, इंग्लंडचा 7 विकेट्सनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर

IND vs ENG, 5th Test, Edgbaston Stadium : बर्मिंगहम येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात भारताचा सात विकेट्सनी पराभव झाला असून यावेळी इंग्लंडने एका दमदार फलंदाजीचं दर्शन घडवलं.

IND vs ENG, 5th Test :  भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत सात विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मालिकेत 2-1 ने आघाडीवर असलेला भारत मालिका जिंकू शकला नाही. मालिका 2-2 ने अनिर्णित सुटली. सामन्यात अखेरच्या डावात भारताने दिलेले 378 धावांचे लक्ष्य इंग्लंडने एका सेशनमध्ये 7 गडी राखून जिंकले. यामध्ये जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांची शतकं फार महत्त्वाची ठरली. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

IND vs ENG 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. कसोटी सामन्यातही नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचनुसार नाणेफेक इंग्लंडने जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आणि अखेर अप्रतिम खेळाच्या जोरावर सामना देखील जिंकला.
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताच्या पहिल्या डावात सर्व फलंदाजांची अवस्था खराब झाली होती. 100 च्या आतच निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. पण त्याचवेळी ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या द्वीशतकीय भागिदारीने भारताचा डाव सावरला. दोघांनी शतक ठोकली आणि भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
  3. त्यानंतर इंग्लंडचा डाव सुरुवातीला खराब होत होता. भारतीय गोलंजदाज दमदार गोलंदाजी करत होते. पण तेव्हा जॉनी बेअरस्टोने 106 धावा ठोकत संघाचा डाव सावरला आणि धावसंख्या 284 पर्यंत नेली.
  4. ज्यानंतर पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. मग दुसरा डाव खेळायला आलेल्या भारताच्या फलंदाजांना खास कामगिरी केली नाही. पण पंत (57) आणि पुजाराची (66) अर्धशतकं संघासाठी महत्त्वाची ठरली.
  5. दुसऱ्या डावात भारत 245 धावा करु शकला. ज्यामुळे इंग्लंडसमोर 378 धावांचे एक तगडे लक्ष्य भारताने ठेवले होते.
  6. पण या दोघांशिवाय इतर खेळाडू मात्र खास कामगिरी करु शकले नाहीत. विशेष म्हणजे भारताने तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. कार्तिक, अक्षर आणि हर्षल शून्यावर बाद झाले. आयर्लंडकडून मार्कने 3 तर जोशूवा आणि क्रेगने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. पण भारताने संजू आणि दीपकच्या खेळीच्या जोरावर 225 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
  7. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर अॅलेक्स आणि जॅक यांनी दमदार सुरुवात केली. पण अॅलेक्स 56 तर जॅक 46 धावा करुन बाद झाला. नंतर ओली शून्य धावांवर बाद झाला. बुमराहने ऑली आणि जॅकला बाद केलं. तर अॅलेक्स धावचीत झाला.
  8. त्यानंतर मात्र जो रुट आणि जॉनी यांनी तुफान फटकेबाजी केली. चौथ्या दिवशीच्या अखेरीस जो रुटने 112 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 78 धावा लगावल्या असून जॉनीने 87 चेंडूत 8 चौकारांसह एक षटकार ठोकत नाबाद 72 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडचा स्कोर 259 वर तीन बाद होता आणि पाचवा संपूर्ण दिवस हातात असताना त्यांना 119 धावांची गरज विजयासाठी होती.
  9. ज्यानंतर पाचव्या दिवशी खेळ सुरु होऊन पहिल्याच सेशनमध्ये जो आणि जॉनीने तुफान फटकेबाजी करत आपआपली शतकंही पूर्ण केली आणि संघाला एक तगडा विजयही मिळवून दिला.
  10. दोन्ही डावात जॉनीने ठोकलेल्या शतकामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.

हे देखील वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget