IND Vs ENG: हनुमा विहारीची एक चूक पडली भारी, बेअरस्टोचा झेल सोडला अन् सामनाच फिरला!
England vs India Rescheduled match: बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे.
England vs India Rescheduled match: बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाअखेर इंग्लडच्या संघानं तीन विकेट्स गमावून 259 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूट 76 तर, जॉनी बेअरेस्टो 72 धावा करून नाबाद परतले आहेत. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयसाठी 119 धावांची गरज आहे. सामन्यादरम्यान भारताचा युवा फलंदाज हुनमा विहारीन आणि ऋषभ पंतनं जॉनी बेअरस्टोचा झेल सोडला आणि सामना इंग्लंडच्या बाजूनं झुकला.
भारतीय संघाचं कमबॅक
या सामन्यात भारतानं इंग्लंडला 378 धावांचं लक्ष्य दिले होते. इंग्लंडने चौथ्या दिवशी दमदार सुरुवात करत एकही विकेट न गमावता 107 धावा केल्या. मात्र, त्यानंतर भारतीय संघानं दोन धावांच्या आत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत कमबॅक केलंय.
भारतानं दोनदा संधी गमावली
यानंतर भारतीय संघाच्या नजरा बेअरस्टो आणि रूटच्या विकेट्सवर खिळल्या होत्या. बेअरस्टोला बाद करण्यासाठी भारतीय संघाला दोन संधी मिळाल्या. पण दोन्ही वेळी भारतीय संघानं बेअरस्टोचा झेल सोडला. पहिल्यांदा हनुमा विहारी आणि त्यानंतर ऋषभ पंतनं बेअरस्टोचा झेल सोडला. त्यानंतर सामन्याला वेगळं वळण मिळालं. या सामन्यात इंग्लंडचा विजयाच्या उंबरठ्यावर थांबला आहे.
इंग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर
जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळं पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली. तर, भारताच्या मालिका विजयाच्या आशा धूसर झाल्या आहेत. भारतानं दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघानं चौथ्या दिवसाअखेर तीन विकेट्स गमावून 259 धावा केल्या आहेत. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो मैदानात उपस्थित असून इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा-
- Rishabh Pant : तब्बल 49 वर्षानंतर असा योगायोग! एकाच सामन्यात शतकासह अर्धशतक करण्याची भारतीय यष्टीरक्षकाची किमया
- Ind vs ENG, Day 4, Innings Highlights : इंग्लंडच्या फलंदाजांकडून अप्रतिम खेळाचं दर्शन, रुट-जॉनीची तुफान फटकेबाजी, विजयासाठी धावांचीच गरज
- Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक